PMC Fireman Bharti Physical Exam Results | फायरमन पदाच्या शारीरिक चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर | पुणे मनपा वेबसाईट वर निकाल प्रसिद्ध
Pune Mahanagarpalika Fireman Bharti 2023 | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने फायरमन (Fireman) पदासाठी पात्र झालेल्या 575 उमेदवारांची शारीरिक चाचणी परीक्षा 26 ते 29 ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात आली. त्यानुसार उमेदवारांची शारीरिक पडताळणी चाचणी परीक्षा पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण विभाग, पाषाण, यांचे कार्यालयांतर्गत असलेल्या मैदानावर झाली. दरम्यान या तांत्रिक आणि शारीरिक चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. महापालिका वेबसाईट वर हा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे (Deputy Commissioner Sachin Ithape) यांनी दिली. (Pune Mahanagarpalika Fireman Bharti 2023)
पुणे महापालिकेच्या वतीने 320 पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली. यातील 200 जागा या फायरमन पदाच्या होत्या. त्यानुसार महापालिकेकडे 3500 हून अधिक अर्ज आले होते. या उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली. 120 मार्कांची परीक्षा होती. यात किमान 54 गुण मिळणे आवश्यक होते. यात 666 लोक उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार शारीरिक चाचणी परीक्षेसाठी 575 उमेदवार पात्र ठरले होते. त्यानुसार शारीरिक चाचणी परीक्षा ही 26 ते 29 ऑक्टोबरला आणि 22 नोव्हेंबर ला घेण्यात आली होती. त्यानुसार या चाचणीचे गुण महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
—
अंतिम निकालासाठी वाट पाहावी लागणार
दरम्यान हा फक्त शारीरिक चाचणीचा निकाल आहे. अंतिम निकाल अजून बाकी आहे. कारण महिला उमेदवारांच्या उंचीबाबतचा मुद्दा कोर्टात प्रलंबित आहे. त्याची सुनावणी अजून बाकी आहे. शिवाय काही तांत्रिक मुद्द्यांबाबत महापालिकेने काही संस्थांकडून मार्गदर्शन मागवले आहे. याबाबत पूर्तता झाल्यानंतरच महापालिका अंतिम निकाल घोषित करणार आहे.