PMC Fire Brigade | अग्निशमन दलाकडून पालखी सोहळ्यामध्ये जवान तैनात
Aashadhi Wari 2025 – (The Karbhari News Service) – आषाढी वारीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखीचे पुण्यनगरीत आगमन होत असते. यावेळी लाखोच्या संख्येत वारकरी संप्रदाय सहभागी होत असतो. या अनुषंगाने पालखी सोहळ्यामध्ये आग वा आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदतीकरिता अग्निशमन दलाकडून दरवर्षी अग्निशमन वाहन पुणे ते पंढरपूर तैनात करण्यात येते. (Palkhi Sohala 2025)
यावर्षी देखील पुणे महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाकडून एक अग्निशमन वाहन एक अधिकारी व सहा जवानांसह पथक काल आळंदीमध्ये दाखल होत पुढे पंढरपूर पर्यंत तैनात राहणार आहे. तसेच पुण्यनगरीत पालखीच्या आगमनावेळी विश्रांतवाडी चौक येथे येरवडा अग्निशमन केंद्रातील वाहन तर संगम पुलानजीक दिवंगत दयाराम राजगुरु अग्निशमन केंद्रातील वाहन पुढे खंडोजीबाबा चौक रस्त्यावर एरंडवणा अग्निशमन केंद्रातील वाहन आणि भवानी – नाना पेठ येथे अग्निशमन मुख्यालयातील वाहन बंदोबस्तकरिता राहणार असून पालखी पुढे मार्गस्थ होताना हडपसर अग्निशमन केंद्रातील वाहन गाडीतळ येथे दाखल असणार आहे.
पुणे ते पंढरपूर मार्गस्थ पालखीत आग वा आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन अधिकारी कैलास शिंदे 8208956316, फायर इंजिन ड्रायव्हर राजू शेलार 9922426600, फायरमन अजितकुमार शिंदे 8805988039 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
—-
“पालखीत वारकरी भाविकांसाठी आमचे अग्निशमन दल नेहमीच सज्ज असते. या गणवेशधारी सेवेमध्ये कर्तव्य बजावत असताना बंदोबस्त करीत माऊलींची सेवा करीत वारी पुर्ण करण्याचे वेगळेच समाधान मिळते.”
- कैलास तुकाराम शिंदे, प्रभारी अग्निशमन अधिकारी
COMMENTS