PMC Fire Brigade | अग्निशमन दलाच्या जवानाचे कौतुक; ड्युटीवर जाताना दुचाकी विझवल्याची घटना

Homeadministrative

PMC Fire Brigade | अग्निशमन दलाच्या जवानाचे कौतुक; ड्युटीवर जाताना दुचाकी विझवल्याची घटना

Ganesh Kumar Mule Sep 03, 2024 8:45 PM

Fire NOC | PMC Pune | फायर एनओसी बाबतच्या तक्रारी टाळण्यासाठी महापालिका आयुक्तांकडून नवीन नियमावली!
Pune Fire News | सुसगाव येथे कामगारांच्या झोपड्यांना आग | ३ सिलेंडरचा स्फोट तर २८ सिलेंडर जळाल्याची घटना
PMC Building Lift | तब्बल 2 तासांनी महापालिका भवनातील लिफ्ट मध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका | लिफ्ट च्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

PMC Fire Brigade | अग्निशमन दलाच्या जवानाचे कौतुक; ड्युटीवर जाताना दुचाकी विझवल्याची घटना

 

PMC Pune News – (The Karbhari News Service) – आज दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास पदमावती चौक येथे एका दुचाकीने पेट घेतला होता. सदर इलेक्ट्रिक दुचाकीच्या अचानक बॅटरीने पेट घेतल्याचे मालकाच्या निदर्शनास येताच रस्त्यावर एकच आरडाओरडा सुरु झाला होता. (Pune PMC News)

त्याचवेळी तेथून दुपारपाळीसाठी ड्युटीवर गंगाधाम अग्निशमन केंद्र येथे येत असलेले मदतनीस फायरमन मंदार संतोष नलावडे (राहणार – भिलारेवाडी, पुणे) यांनी ही घटना पाहताच त्यांनी तातडीने क्षणाचा ही विलंब न करता तेथेच समोर असलेल्या इराणी हॉटेलमधील अग्निरोधक उपकरण (Fire Extinguisher) धावत जाऊन घेत लगेचच पेटलेल्या दुचाकीवर मारुन क्षणातच आग आटोक्यात आणत धोका दूर केला.

जवान मंदार नलावडे यांनी प्रसंगावधान राखत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे दुचाकी मालक व त्यांच्या मिञपरिवाराने या कामगिरीबद्दल जवानाचे आभार मानले. तसेच दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांना ही भ्रमणध्वनी करुन अग्निशमन दलाच्या कामकाजाबाबत मोठे समाधान व्यक्त केले. अग्निशमन प्रमुख यांनी ही मंदार नलावडे यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कौतुक केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0