PMC EV Charging Station | पुणेकरांना पुणे महापलिकेच्या EV चार्जिंग स्टेशनची शुक्रवार पासून मिळणार सुविधा 

HomeBreaking Newsपुणे

PMC EV Charging Station | पुणेकरांना पुणे महापलिकेच्या EV चार्जिंग स्टेशनची शुक्रवार पासून मिळणार सुविधा 

कारभारी वृत्तसेवा Jan 10, 2024 3:28 PM

Maratha Samaj Survey | PMC | पुणे महापालिकेच्या 1 हजार हून अधिक कर्मचाऱ्यांच्या मराठा आरक्षणाच्या कामासाठी नेमणुका 
The Karbhari Impact |  The state government is positive about giving botanical garden site for the JICA project  
PMC JE Bharti 2024 | पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता (JE Civil) होण्याची संधी | अखेर जाहिरात आली! 

PMC EV Charging Station | पुणेकरांना पुणे महापलिकेच्या EV चार्जिंग स्टेशनची शुक्रवार पासून मिळणार सुविधा

| शुक्रवारी २१ चार्जिंग स्टेशन चे केले जाणार उद्घाटन

 

PMC EV Charging Stations | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) हद्दीतील विविध ८२ ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) चार्जिंग स्टेशन निर्माण करण्यात येणार आहेत. त्यातील २१ स्टेशन चे काम पूर्ण झाले आहे. याचे शुक्रवारी उद्घाटन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्याच दिवसापासून नागरिकांना याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (PMC Pune News)

 

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील विविध ८२ ठिकाणी कार्यालयीन इमारती, वाहनतळ क्षेत्रे, उद्याने, संग्रहालये, सभागृहे, दवाखाने व स्मशानभूमी इ) नागरिकांच्या सोयीकरिता PPP तत्वावर आधारित इलेक्ट्रिक
व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. सदर प्रकल्पाचा कालावधी ८ वर्षे आहे. मे. मरीन इलेक्ट्रिकल्स कंपनीला याचे काम देण्यात आले आहे. येणारा सर्व खर्च संबंधित ठेकेदाराकडून करण्यात येणार आहे व त्यामधून येणाऱ्या net profit मधून ५०% शेअर पुणे महानगरपालिकेला देण्यात येणार आहे. (Pune PMC News)

संबंधित ठेकेदार खालील बाबींसाठी जबाबदार असेल

१) सार्वजनिक चार्जिंग स्टेशन (PCS) चा सर्व वीज खर्च
२) चार्जिंग सुविधेचा वापर करणाऱ्या वाहनांची सुरक्षितता आणि सुरक्षा
३) ८ वर्षासाठी प्रकल्पाची सर्व प्रकारची देखभाल

नागरिकांना काय करावे लागेल?

चार्जिंग स्टेशन्स नागरिकांनी वापरण्यासाठी प्ले स्टोअर मधून अथवा प्रत्येक चार्जिंग स्टेशन वरील QR कोड स्कॅन करून Bijlify हे App डाउनलोड करून व स्वतःचा मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करता येईल. सदर App द्वारे हे लोकेशन मॅपच्या सहाय्याने ठिकाण व पार्किंग उपलब्ध आहे किंवा नाही याबाबत माहिती सहज कळू शकते तसेच पेमेंट सुविधा सुद्धा App द्वारे उपलब्ध करण्यात आलेली असून चार्जिंग शुल्क (charges) नागरिकांना र.रु. १३ ते १९ प्रति युनिट दर राहणार आहे.  जे इतर खाजगी चार्जिंग स्टेशन दरापेक्षा कमी राहणार आहे. तरी सर्व नागरिकांनी या अत्याधुनिक सेवेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन पुणे महानगरपालिकेतर्फे करण्यात
आले आहे.

| या ठिकाणी असतील चार्जिंग स्टेशन्स

१ पुणे महानगरपालिका पार्किंग
२ सावरकर भवन पार्किंग
३ गणेश कला क्रीडामंच
४ यशवंतराव चव्हाण नाटयगृह / बाळासाहेब ठाकरे कलामंदिर
५ बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय
६ घोले रोड क्षेत्रिय कार्यालय
७ टिळक रोड क्षेत्रिय कार्यालय
८ बालगंधर्व नाट्यगृह
९ स्केचर्स शोरूम जंगली महाराज रोड पार्किंग
१० मॅकडोनाल्ड्स जंगली महाराज रोड पार्किंग
११ लेमन सलन एफ सी रोड पार्किंग
१२ कुशल वाल स्ट्रीट एफ सी रोड पार्किंग
१३ आर्ट स्टेशन पुणे एफ सी रोड पार्किंग
१४ मिलेनिअम प्लाझा एफ सी रोड पार्किंग
१५ पेशवे पार्क पार्किंग
१६ मंडई आर्यन पार्किंग
१७ गुलटेकडी पार्किंग
१८ नवलोबा पार्किंग नं. ३८ शुक्रवार पेठ
१९ पद्मावती पम्पिंग स्टेशन पार्किंग
२० पंडित भीमसेन जोशी ऑडीटोरीअम
२१ संजय गांधी हॉस्पिटल पार्किंग