PMC Encroachment Department | पुणे मनपा अतिक्रमण विभागाकडून 22 गणेश मंडळावर कारवाई
| मांडव न काढणाऱ्या मंडळांना नोटिसा बजावण्याचे काम सुरु
PMC Encroachment Department | पुणे : महापालिका अतिक्रमण विभागाच्या नियमानुसार गणेशोत्सव (Pune Ganeshotsav) संपल्यानंतर दोन दिवसात मंडळांनी मांडव काढून घेऊन रस्ता रिकामा करणे आवश्यक आहे. मात्र, अद्याप अनेक मंडळांचे मांडव रस्त्यावर उभे आहेत. अशा मंडळांना क्षेत्रीय कार्यालयांकडून (PMC Ward Offices) नोटिसा बजावण्याचे काम सुरु झाले आहे. तसेच 22 मंडळावर कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती उपायुक्त माधव जगताप (PMC Deputy Commissioner Madhav Jagtap) यांनी दिली. (Pune Municipal Corporation)!
पुणे शहरात गणेश मंडळांतर्फे गणेशोत्सवात देखाव्यांसाठी मोठे मांडव उभारले जातात. तसेच विसर्जन मिरवणुकीतील रथ रस्त्यात उभे केले जातात. गणेशोत्सव संपल्यानंतर त्यांनी दोन दिवसात हे मांडव, देखावा, रथावरील सजावट काढून घेऊन रस्ता रिकामा करणे आवश्यक आहे. पण अद्यापही मांडव काढला गेला नसल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. काही मंडळांनी मांडव काढण्याचे काम सुरु केले आहे, पण त्यासाठी मंडळासमोराचा संपूर्ण रस्ता बंद ठेवून काम केले जात असल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे. (PMC Pune Encroachment Department)
याबाबत जगताप यांनी सांगितले कि, पुणे शहरामध्ये नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सव नंतर विहित मुदतीत म्हणजे दोन दिवसाच्या आत मध्ये मांडव कमानी रनिंग मंडप न काढल्यामुळे शहरातील 22 गणेशोत्सव मंडळाचे मंडप काढण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर शहरातील अनधिकृत फ्लेक्स बोर्ड बॅनर्स काढणे बाबतची कार्यवाही सुरू करण्यात आलेली असून पुढील काही दिवस सदाची कारवाई तीव्र करून संपूर्ण शहर अतिक्रमण मुक्त करण्याबाबतची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. या मंडळांनी मुदतीत मंडप कमानी काढलेल्या नाहीत त्यांना नोटीस देण्याबाबतची कार्यवाही देखील सुरू करण्यात आलेली आहे. असेही माधव जगताप म्हणाले. (PMC Pune)
—–
News Title | PMC Encroachment Department | Pune Municipal Encroachment Department action on 22 Ganesh Mandals