PMC Encroachment Department | आपली बेवारस वाहने रस्त्यावरून हटवा | अन्यथा 5 हजार ते 25 हजारा पर्यंत द्यावे लागतील चार्जेस 

HomeBreaking Newsपुणे

PMC Encroachment Department | आपली बेवारस वाहने रस्त्यावरून हटवा | अन्यथा 5 हजार ते 25 हजारा पर्यंत द्यावे लागतील चार्जेस 

Ganesh Kumar Mule Jul 14, 2023 1:55 PM

PMC Pune Deputy commissioner Madhav Jagtap | उपायुक्त माधव जगताप को कारण बताओ नोटिस जारी 
PMC Deputy Commissioner Madhav Jagtap | उपायुक्त माधव जगताप यांना कारणे दाखवा नोटीस
PMC Unique Pune Walk | पुणे महापालिकेचा पहिला “युनिक पुणे वॉक”

PMC Encroachment Department | आपली बेवारस वाहने रस्त्यावरून हटवा | अन्यथा 5 हजार ते 25 हजारा पर्यंत द्यावे लागतील चार्जेस

PMC Encroachment Department | पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या (PMC Encroachment Department) वतीने बेवारस वाहनांवर (Abandoned vehicles) कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. असे वाहन रस्त्यावर किंवा फुटपाथवर आढळल्यास गाडी जप्त केली जाईल. ती गाडी सोडवण्यासाठी गाडी मालकाला 5 हजार पासून ते 25 हजार पर्यंत दंड (Removal Charges) होऊ शकेल. अतिक्रमण विभागाकडून अशा लोकांना नोटीस देखील पाठवणे सुरु केले आहे. अशी माहिती उपायुक्त माधव जगताप यांनी दिली. (PMC Encroachment Department)

पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत रस्ता, पदपथावर इत्यादी ठिकाणी बंद / बेवारस वाहने, पडीक नादुरुस्त वाहने आढळ होत आहेत. अशी वाहने रस्त्यावर थांबल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे तसेच सदर वाहने जागेवरून न हलविल्यामुळे कचरा तयार होऊन दुर्गंधी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यापूर्वी रस्त्यावरील बंद / बेवारस वाहने उचलणेची कारवाई करणेत आली आहे. रस्त्यावरील  बंद / बेवारस वाहनांबाबत नागरिकांच्या देखील तक्रारी सातत्याने प्राप्त होत आहेत.  त्यामुळे अशी वाहने पुणे महानगरपालिकेकडील क्षेत्रिय कार्यालयामार्फत कारवाई करून जप्त करणेत येणार आहेत.  (PMC Pune News)

-जप्त केलेल्या वाहनांसाठी  रिमुव्हल चार्जेस खालील प्रमाणे –

1. अवजड वाहनासाठी (प्रवासी बस, ट्रक इ.) = २५,०००/-
2. हलकी वाहने (१० टना पर्यंत) = २०,०००/-
3. चार चाकी वाहने (कार, जीप इ.) = १५,०००/-
4. तीन चाकी (रिक्षा, टेम्पो) = १०,०००/-
5. दुचाकी (स्वयंचलित) र= ५०००/-
अतिक्रमण विभागाच्या माहितीनुसार  संबंधित वाहन मालक १ महिन्याचे कालावधीमध्ये सोडवून घेऊ शकेल. सदर वाहनांवर क्षेत्रिय कार्यालयामार्फत नोटीस लावण्यात येणार असून याकरिता ७ दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. संबंधित वाहनधारकांनी ७ दिवसांच्या मुदतीत वाहन काढून न घेतल्यास सदर वाहनावर पुणे महानगरपालिकेकडून जप्तीची कारवाई करण्यात येत आहे, त्यानुसार शहरात २२ वाहने जप्त करण्यात आली असून १८ वाहनांना नोटीस लावण्यात आल्या आहेत. असे ही खात्याकडून सांगण्यात आले. (Pune Municipal Corporation News)
—–
News Title | PMC Encroachment Department | Get your abandoned vehicles off the road Otherwise charges ranging from 5 thousand to 25 thousand have to be paid