PMC Encroachment action on JM Road | जंगली महाराज रस्त्यावर असलेली चौपाटी उध्वस्त | महापालिकेची कारवाई
PMC Building Development Department- (The Karbhari News Service) – जंगली महाराज रस्त्यावर (JM Road Pune) पेट्रोल पंपाच्या जागेवर JM कॉर्नर नावाची चौपाटी उभारण्यात आली होती. या मध्ये सुमारे 20 छोटी मोठी दुकाने तयार करून तेथे स्नॅक्स हॉटेल्स सुरू होती. महापालिकेच्या वतीने आज कारवाई करून सदर दुकाने पाडण्यात आली. अशी माहिती महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation (PMC)
या वेळी सुमारे 3400 चौरस फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले. Jcb,दोन गॅस कटर ,बिगारी च्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. संबंधितांना 15 दिवसांपूर्वी नव्याने नोटिस देण्यात आली होती. तसेच यापुर्वी तेथे कारवाई करण्यात आली होती. अशी माहिती बांधकाम विकास विभागाच्या वतीने देण्यात आली.