PMC Encroachment Action | औंध मधील साई चौकात खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व पुणे मनपाची संयुक्त कारवाई  | आज रात्रीच रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार 

HomeपुणेBreaking News

PMC Encroachment Action | औंध मधील साई चौकात खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व पुणे मनपाची संयुक्त कारवाई | आज रात्रीच रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार 

कारभारी वृत्तसेवा Jan 12, 2024 2:49 PM

Pune Lok Sabha Constituency | Pune Congress | पुणे लोकसभेसाठी काँग्रेस कडून इच्छुकांची भली मोठी यादी! | 20 लोकांची निवडणूक लढवण्याची इच्छा
Maratha Samaj Survey | PMC | पुणे महापालिकेच्या 1 हजार हून अधिक कर्मचाऱ्यांच्या मराठा आरक्षणाच्या कामासाठी नेमणुका 
PMC JE Bharti 2024 | पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता (JE Civil) होण्याची संधी | अखेर जाहिरात आली! 

PMC Encroachment Action | औंध मधील साई चौकात खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व पुणे मनपाची संयुक्त कारवाई

| आज रात्रीच रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार

 

PMC Encroachment Action | औंध परिसरातील (Sai Chowk, Aundh Pune) साई चौक, जयकर पथ येथे अतिक्रमण कारवाई करण्यात आली. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड (Khadki Cantonment Board) व पुणे मनपाच्या (Pune Municipal Corporation) वतीने ही संयुक्त कारवाई करण्यात आली. यामध्ये जवळपास ४४ अनधिकृत स्टॉल हटवण्यात आले. दरम्यान आता रस्ता मोकळा झाल्याने आज रात्रीच रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार असून हा रस्ता चौपदरी केला जाणार आहे. अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakane PMC) यांनी दिली. (PMC Pune News)

हा भाग खडकी कॅन्टोन्मेंट व पुणे म.न.पा हद्दीवर येत असून, कॅन्टोन्मेंट हद्दीत येतो. खडकी रेल्वे स्टेशन पिछाडीस हा चौक येतो. औंध, बोपोडी हद्दीतील नागरिक याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. या चौकामध्ये सुमारे 44 स्टॉल धारकांनी अनेक वर्षापासून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्याबाबत पुणे जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रारी आल्या होत्या. त्याबाबत खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व पुणे म.न.पा ला संयुक्त कारवाई करनेच्या सूचना दिल्या होत्या. खडकी कॅन्टोन्मेंट मुख्याधिकारी यांनी पुणे म.न.पा कडे अतिक्रमण कारवाई व रस्ता दुरूस्ती साठी मदत मागितली. महापालिका आयुक्त यांनी आवश्यक सहकार्य करणेचे मान्य केले. त्यानुसार आज  संयुक्त कारवाई करणेत आली. त्यामध्ये सर्व 44 स्टॉल काढून टाकण्यात आले.  आले. त्यामुळे साई चौक मोकळा झाला. आज रात्री त्याचे डांबरीकरण करून, ज्यादा उपलब्ध रस्त्याचे तातडीने रूंदीकरण करणेत येणार आहे.  सध्या उपलब्ध 12 मी रुंदीचा रस्ता सुमारे 24मी पर्यंत रुंदीचा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटनेस मदत होणार आहे.

विकास ढाकणे ढाकणे ( अति.महा.आयुक्त) व रॉबिन बलेचा ( मुख्याधिकारी, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड) यांचे नियंत्रणाखाली  अनिरुद्ध पावसकर  ( मुख्य अभियंता), साहेबराव दांडगे ( अधीक्षक अभियंता), दिनकर गोजारे ( कार्यकारी अभियंता), संतोष वारुळे ( उपआयुक्त),  दापेकर ,( महा.सहा आयुक्त, औंध क्षेत्रिय कार्यालय) यांनी ही कारवाई केली.


पीएमआरडीए च्या वतीने मेट्रोचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार विद्यापीठ चौकात पूल उभारला जाणार आहे. यामुळे वाहतुकीस अडचण होऊ शकते. त्यामुळे वाहतुकीस अडचण करत असलेल्या जागांवर अतिक्रमण कारवाई करण्यात येत आहे. अशा सर्व बॉटलनेक वर कारवाई करण्यात येईल. दरम्यान साई चौकातील रस्ता आता चारपदरी केला जाणार आहे.

  • विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, पुणे मनपा.