PMC Employees Transfer | नियतकालिक बदली झालेल्या सेवकांची कर आकारणी व कर संकलन खात्याकडे बदली करण्याचे प्रस्ताव रद्द करा | प्रमोद नाना भानगिरे यांची महापालिका अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे मागणी
Pramod Nana Bhangire – (The Karbhari News Service) – वरिष्ठ लिपिक, उप अधीक्षक, अधीक्षक यांचा उल्लेख कार्यालयीन परिपत्रक मध्ये नसल्याने कर आकारणी व कर संकलन कार्यालयातून बदली झालेले वरिष्ठ लिपिक, उप अधिक्षक व अधीक्षक यांनी सेवकवर्ग विभागामार्फत प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी कर आकारणी कर संकलन विभागात कामास व बदली खात्यामध्ये वेतनास असा प्रस्ताव आर्थिक देवाणघेवाण करून तयार करण्यात आला आहे. असा आरोप शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केला आहे. तसेच नियतकालिक बदली झालेल्या सेवकांची कर आकारणी व कर संकलन खात्याकडे बदली करण्याचे प्रस्ताव रद्द करा, अशी मागणी भानगिरे यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त (जनरल) यांच्याकडे केली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
भानगिरे यांच्या पत्रानुसार पुणे महानगरपालिका प्रशासनामधील सेवकांच्या दर ३ वर्षांनी खाते अंतर्गत बदली करण्याचे राज्य शासन यांचे आदेशानुसार बदल्या करण्यात आलेल्या आहेत. बदली खात्यात सेवकांनी रुजू झाल्यानंतर संबंधित विभागाच्या खातेप्रमुखांनी सर्व सेवक रुजू झाले असलेबाबतचा अहवाल सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करावयाचा आहे असे नमूद आहे.
मात्र अहवाल खातेप्रमुखांनी सादर न केल्यामुळे लिपिक टंकलेखक यांच्याबाबत बदली खात्यामध्ये रुजू झाल्याचा अहवालाबाबत कार्यालयीन परिपत्रक काढण्यात आले आहे. सदर परिपत्रकात काही सेवक बदली खात्यामध्ये अद्याप रुजू झाले नाही, हि बाब गंभीर असून सर्व खातेप्रमुखांनी बदली झालेल्या सेवकांना बदली खात्यामध्ये त्वरित कार्यमुक्त करण्यात यावे. तसेच बदलीच्या खात्यामध्ये सेवक रुजू झाल्याचा अहवाल आस्थापना विभागाकडे सादर करावा असे नमूद केले आहे. परंतु कार्यालयीन परिपत्रक हे लिपिक टंकलेखक या पदाबाबत असून त्यामध्ये अन्य पदांचा उल्लेख केलेला नाही, हि बाब गंभीर आहे.
वरिष्ठ लिपिक, उप अधीक्षक, अधीक्षक यांचा उल्लेख कार्यालयीन परिपत्रक मध्ये नसल्याने कर आकारणी व कर संकलन कार्यालयातून बदली झालेले वरिष्ठ लिपिक, उप अधिक्षक व अधीक्षक यांनी सेवकवर्ग विभागामार्फत प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी कर आकारणी कर संकलन विभागात कामास व बदली खात्यामध्ये वेतनास असा प्रस्ताव आर्थिक देवाणघेवाण करून तयार करण्यात आला आहे. सदर प्रस्तावातील सेवकांनी यापूर्वी कर आकारणी व कर संकलन विभागाकडे गेली ७ ते ८ वर्षे कामकाज केलेले आहे. अशा प्रकारचे प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी प्रस्ताव तयार करून, सेवकांना पुन्हा त्याच खात्यात कामास ठेवले जाते व कागदोपत्री बदल्या झालेल्या आहेत असा देखावा केला जात आहे. हे आपल्या निदर्शनास आणून देत आहोत. असे भानगिरे यांनी म्हटले आहे.
महापालिका आयुक्त यांना वरीलप्रमाणे बदलीचे तयार केलेला प्रस्तावाबाबतची माहिती घेऊन सदर प्रस्ताव त्वरित रद्द करणेबाबत आदेश देण्यात यावेत. सर्व बाबींचा नगरविकास विभागाकडून अहवाल मागविण्यात येऊन त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी भानगिरे यांनी केली आहे.

COMMENTS