PMC Employees Time Bound Promotion | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती पुन्हा लटकली!   | राज्य सरकारकडे पाठवला जाणार प्रस्ताव

HomeBreaking Newsपुणे

PMC Employees Time Bound Promotion | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती पुन्हा लटकली! | राज्य सरकारकडे पाठवला जाणार प्रस्ताव

Ganesh Kumar Mule Jul 14, 2023 11:57 PM

Difference In pay : 7th pay Commission : मनपा कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाचा फरक आता आयुक्तांच्या मार्गदर्शनानंतर!  
8th Pay Commission Update | 8 व्या वेतन आयोगाची केंद्र सरकारची तयारी सुरू!
7th Pay Commission : PMC : अखेर वेतन आयोगानुसार वेतन होण्यास सुरुवात 

PMC Employees Time Bound Promotion | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती पुन्हा लटकली! 

 

| राज्य सरकारकडे पाठवला जाणार प्रस्ताव 

 
PMC Employees Time Bound Promotion |  पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना (PMC Pune Employees) सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) देण्यात येणाऱ्या कालबद्ध पदोन्नतीचा प्रस्ताव (Time Bound Promotion Proposal) पुन्हा एकदा लटकला आहे. याबाबतची प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त (PMC Additional Commissioner) यांनी दिले आहेत. याच्या अंमलबजावणी बाबत राज्य सरकार कडून स्पष्टीकरण घेतले जाणार आहे. यामुळे कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. (PMC Employees Time Bound Promotion)

महापालिका कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात वेतन आयोगानुसार वाढीव वेतन देण्यात आले तरी कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात आला नव्हता. याबाबत कर्मचाऱ्यांकडून प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात होता. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो लेखा विभागाच्या माध्यमातून अतिरिक्त आयुक्तांसमोर मान्यतेसाठी ठेवला होता. मात्र अतिरिक्त आयुक्तांनी हा विषय प्रलंबित ठेवला होता. यामुळे महापालिकेवर किती आर्थिक भार येईल, याची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. ही माहिती यायला बराच अवधी गेला. त्यानंतर प्रक्रिया सुरु झाली. कर्मचाऱ्यांची माहिती देखील घेतली जाऊ लागली. मात्र पुन्हा एकदा हा प्रस्ताव रखडला आहे. कारण सरकारचे स्पष्टीकरण येईपर्यंत हा विषय स्थगित ठेवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त(ज) यांनी दिले आहेत. (Pune Municipal Corporation Employees)

– सामान्य प्रशासन विभागाचे सर्क्युलर जारी

सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे कि, पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना लागू केलेल्या ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशी व सुधारित वेतन संरचना यानुसार तीन लाभांची सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजना (१०/२०/३० वर्षे) लागू करण्याबाबत स कार्यालयीन आदेश प्रसृत करण्यात आलेला आहे. त्यानुसार कार्यवाही सुरु झालेली आहे. या  प्रकरणी सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेच्या अंमलबजावणीबाबत राज्य शासनाकडून स्पष्टीकरण मागवावे, तोपर्यंत दाखल प्रस्ताव व यापूर्वी मान्य केलेले प्रस्ताव देखील पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करावेत, असे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांनी दिलेले आहेत. (PMC General Administration Department)
त्यानुषंगाने सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचे अंमलबजावणीबाबत राज्य
शासनाकडून स्पष्टीकरण मागविणेची कार्यवाही सामान्य प्रशासन विभागाकडून करण्यात येईल. तरी, सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे सर्व प्रस्ताव पुढील आदेश होईपर्यंत स्थगित ठेवण्यात यावेत. असे आदेशात म्हटले आहे. तोपर्यंत कर्मचाऱ्यांना वाटच पाहावी लागणार आहे. (7th Pay Commission Update)

– काय आहे कालबद्ध पदोन्नती

काही महापालिका कर्मचाऱ्यांची महापालिकेत बरेच वर्षे सेवा होते. मात्र काही तांत्रिक कारणामुळे त्यांना पदोन्नतीचे पद मिळत नाही. त्यामुळे पद आणि वेतन अशा दोन्ही पासून कर्मचाऱ्याला वंचित राहावे लागत होते. यावर तोडगा काढण्यात आला. त्यानुसार दोन टप्पे करण्यात आले. ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 12 वर्ष आणि 24 वर्ष पूर्ण झाली असेल, त्यांना त्यांच्या सेवेनुसार वेतनवाढदेण्यात आली. पद तेच असले तरी कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन मिळू लागले. 1994 साली हा नियम लागू करण्यात आला. यामध्ये 2003 साली सुधारणा करण्यात आली. त्यानंतर 2013 यात आणखी स्पष्टता आणण्यात आली. मग सातव्या वेतन आयोगानुसार सरकार ने 2016 सालापासून दोन ऐवजी तीन टप्पे केले. त्यामध्ये 10 वर्ष, 20 वर्ष आणि 30 वर्ष असे टप्पे करण्यात आले आहेत. (PMC Pune News)
—-
News Title | PMC Employees Time Bound Promotion | The time-bound promotion of Pune municipal employees is suspended again!