PMC Employees Salary | महापालिका अधिकारी, कर्मचारी यांचे वेतन १ तारखेला जमा न झाल्यास, खातेप्रमुख व बिल लेखनिक यांना जबाबदार धरणार | महापालिका अतिरिक्त आयुक्तांचा इशारा
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी यांचे मासिक वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला जमा न झाल्यास, सर्व संबधित खातेप्रमुख व बिल लेखनिक यांना जबाबदार धरण्यात येईल. असा इशारा अतिरिक्त आयुक्त एम जे प्रदीप चंद्रन यांनी दिला आहे. दरम्यान याबाबत २४ मी ला देखील अतिरिक्त आयुक्त यांनी या बाबत आदेश दिले होते. (M J Pradip Chandren IAS)
पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी / कर्मचारी यांचे मासिक वेतन विहित वेळेत अदा करणेबाबत अतिरिक्त आयुक्त यांनी आदेश जारी केले आहेत. त्यानुसार
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग यांचेसमवेत ६ ऑगस्ट रोजी व सफाई कर्मचारी आयोग यांचेसमवेत ७ ऑस्रोगुस्जीत झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने, दोन्ही आयोगाच्या सदस्यांनी पुणे महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी यांचे मासिक वेतन वेळेवर होत नाही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सदरची बाब प्रशासकीयदृष्टया गंभीरस्वरुपाची आहे.
ही देखील बातमी वाचा : PMC Employees Salary | पुणे मनपा अधिकारी आणि कर्मचारी यांचे मासिक वेतन वेळेवर अदा करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश
तरी, सर्व संबधित खातेप्रमुख व बिल लेखनिक यांना सक्त आदेश देण्यात आले आहेत की “पुणे मनपातील सर्व विभाग / खात्यातील अधिकारी / कर्मचारी / बिल लेखनिकांनी पगारबिलाच्या प्रत्येक महिन्यात दि. २१ ते २५ तारखेपर्यंत रजा प्रकरणे वेतन विभागाकडून तपासून घ्यावीत. त्यासाठी प्रत्येक सेवकाची. १ ते २० पर्यंत प्रत्यक्ष हजेरी घेऊन व दि. २१ ते महिनाअखेर संभाव्य हजेरी घेऊन सदर महिन्याचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला अदा करण्यात यावे. पुणे महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी यांचे मासिक वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला जमा न झाल्यास, सर्व संबधित खातेप्रमुख व बिल लेखनिक यांना जबाबदार धरण्यात येईल” याची नोंद घेण्यात यावी. तसेच दि. २१ ते महिनाअखेर ज्या सेवकांची रजा असेल अशा सेवकांची फेर हजेरी वेतन विभागाकडून पुढील महिन्यात दि. १ ते ५ तारखेपर्यंत तपासून घेण्याची दक्षता घ्यावी. असे अतिरिक्त आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

COMMENTS