PMC Employees Salary | पुणे मनपा अधिकारी आणि कर्मचारी यांचे मासिक वेतन वेळेवर अदा करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश 

Homeadministrative

PMC Employees Salary | पुणे मनपा अधिकारी आणि कर्मचारी यांचे मासिक वेतन वेळेवर अदा करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश 

Ganesh Kumar Mule May 24, 2025 5:22 PM

Palkhi Sohala 2025 | पुणे महापालिकेकडून दोन्ही पालख्यांचे उत्साहात स्वागत 
Water supply | PMC pune | जलवाहिनीच्या कामामुळे शहराच्या काही भागात पाणीपुरवठा होणार विस्कळीत | जाणून घ्या  सविस्तर 
PMC | News Post | पुणे महापालिका निर्माण करणार नवीन 549 पदे! | वर्ग 1 ते 4 मधील पदे

PMC Employees Salary | पुणे मनपा अधिकारी आणि कर्मचारी यांचे मासिक वेतन वेळेवर अदा करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका अधिकारी आणि कर्मचारी (PMC Employees and Officers Salary) यांचे वेतन वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी सफाई आयोगाकडे करण्यात आल्या आहेत. याची गंभीर दखल घेत वेतन वेळेवर देण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी (Prithviraj B P IAS) यांनी प्रशासनाला दिले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

अतिरिक्त आयुक्त यांनी आपल्या आदेशात म्हटले कि, पुणे महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचारी समन्वय समितीची बैठक १९ मे रोजी पार पडली. सदर बैठकीमध्ये सफाई कर्मचारी समन्वय समितीच्या काही सदस्यांनी पुणे महानगरपालिका अधिकारी / कर्मचारी यांचे मासिक वेतन वेळेवर होत नाही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. सदरची बाब गंभीर स्वरुपाची आहे.

त्यानुसार  सर्व संबधित खातेप्रमुख व कर्मचारी यांना सक्त आदेश देण्यात आले आहेत की “पुणे मनपातील सर्व विभाग / खात्यातील अधिकारी / कर्मचारी यांचे मासिक वेतन दर महिन्याच्या दिनांक ०५ पर्यंत वेतन विभागाकडून तपासून घेऊन अदा करण्यात यावीत. अन्यथा सर्व संबधित खातेप्रमुख व कर्मचारी यांना जबाबदार धरण्यात येईल”. असा इशारा देखील अतिरिक्त आयुक्तांनी दिला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: