PMC Employees Promotion | महापालिका कर्मचाऱ्यांना सन्मानाने सेवानिवृत्त होण्याची संधी महापालिका आयुक्त देणार का?
Dr Rajendra Bhosale IAS – (The Karbhari News Service) – महापालिकेत वर्षानुवर्षे काम केल्यानंतर महापालिका कर्मचारी आपल्या पदोन्नतीला पात्र होतात. ही पदोन्नती त्यांच्या हक्काची असते. मात्र त्यांच्या हक्काचा गोष्टी देण्यात महापालिका प्रशासन नेहमी उदासीन असल्याचे दिसून येते. पदोन्नती प्रक्रियेचे प्रस्ताव कधी अतिरिक्त आयुक्त अडवून ठेवतात, तर कधी आयुक्त. मात्र असे प्रस्ताव आयुक्त अडवून ठेवतात, असे फार दुर्मिळ वेळा होते. मात्र आता महापालिका आयुक्त यांनीच उप अधीक्षक ते अधीक्षक या पदाची पदोन्नती प्रक्रिया अडवून ठेवली आहे. विशेष हे की, यातील काही कर्मचारी याच महिन्यात सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे कर्मचारी प्रश्न विचारत आहेत कि, महापालिका आयुक्त आम्हाला सन्मानाने सेवानिवृत्त होण्याची संधी देणार का? (Pune Municipal Corporation – PMC)
उप अधिक्षक ते अधिक्षक पदोन्नती प्रक्रियेची फाईल महापालिका आयुक्त यांच्या मान्यतेसाठी ११ मार्च रोजी सामान्य प्रशासन विभागाने सादर केलेली आहे. मात्र १० दिवस उलटून गेले तरी अद्याप महापालिका आयुक्त यांची या प्रस्तावावर स्वाक्षरी झालेली नाही. ४० हून अधिक सेवकांचे प्रमोशन होणार आहे. या सेवकांमधील काही सेवक दिनांक ३१ मार्च २०२५ रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.
महापालिका आयुक्त यांची एक स्वाक्षरी झाल्यास सुमारे २५-३० वर्ष सेवेनंतर त्यांना वर्ग ३ मधीलच पण वरिष्ठतेच्या अधिक्षक पदावर काम करून सन्मानाने निवृत्त होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच पुढील प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. विशेष म्हणजे महापालिका प्रशासनाला प्रशासन अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी पदावर लोक मिळत नाहीत, कारण खालील कर्मचाऱ्याची पदोन्नती प्रलंबीत राहिली की वरच्या जागा देखील रिक्त राहतात. त्यामुळे मग सरकारचे लोक प्रति नियुक्तीवर येऊन बसतात.
कर्मचाऱ्यांच्या हक्काची पदोन्नती महापालिका आयुक्त या सेवकांना देऊन त्यांना सन्मानाने निवृत्त होण्याची संधी देतील का? याची कर्मचारी वाट बघत आहेत.
COMMENTS