PMC Employees Promotion | पदोन्नती प्रलंबित ठेवल्याने एक दिवसाचे वेतन देण्यास पुणे मनपा कर्मचाऱ्यांचा नकार
| महापालिका कर्मचाऱ्यांची प्रशासनावर नाराजी
PMC Employees Promotion | जुलै २०२३ च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन (One Day Salary) मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये (CM AID fund) देणगी म्हणून उपलब्ध करून देण्यास पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) काही कर्मचाऱ्यांनी हरकत (PMC Employees Objection) घेतली आहे. काही कर्मचाऱ्यांनी याबाबत कारण देताना म्हटले आहे कि प्रशासनाने पदोन्नती प्रलंबित ठेवल्याने (Promotion Pending) आम्ही वेतन देणार नाही. महापालिका प्रशासनाकडून बऱ्याच पदाच्या पदोन्नत्या प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत. यात कर्मचाऱ्यांचे नुकसान आहे. याबाबत कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे. तरीही प्रशासनाला मात्र जाग येत नाही. आता कर्मचाऱ्यांनी अशा पद्धतीने नाराजी दाखवल्यावर तरी प्रशासनाला जाग येईल अशी अपेक्षा आहे. (PMC Employees Promotion)
महाराष्ट्र राज्यामध्ये झालेला अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) व गारपीट यामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीत आपत्तीग्रस्त नागरिकांच्या मदतीकरीता राज्य शासनाकडून मदत कार्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. या नैसर्गिक आपत्तीस (Natural Calamities) सामोरे जाण्यासाठी सहाय्य, मदत व पुनर्वसनाच्या कामात हातभार लागावा म्हणून राज्यातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांचा सहभाग असावा या कर्तव्य बुध्दीने त्यांच्या वेतनातून प्रत्येकी एक दिवसाचे वेतन (One Day Salary) मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये (CM Aid Fund) देण्याबाबत शासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे. या अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त नागरिकांना मदत म्हणून पुणे महानगरपालिका व शिक्षण विभागाकडील शिक्षकेतर अधिकारी/कर्मचाऱ्यांचे (PMC Employees) एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणेबाबत महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांची मान्यता प्राप्त झाली आहे. त्यानुसार प्रशासनाने याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. मात्र काही कर्मचाऱ्यांनी वेतन देण्यास नकार दिला आहे. तसा अर्ज देखील कर्मचाऱ्यांनी दिला आहे. (PMC Pune)
काय म्हटले आहे अर्जात?
कारणे विनंतीपूर्वक अर्ज करतो कि परिपत्रकानुसार ३ नुसार माझ्या माहे जुलै पेड इन ऑगस्ट २०२३ चे मासिक वेतनातून एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करून देण्यास माझी हरकत आहे.
कारण, गेल्या २ वर्षापासून मी पात्र असून देखील मला कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदावर पदोन्नतीने नेमणूक मिळालेली नाही. त्यामुळे माझे सामाजिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान झालेले आहे. माझी काही चुक नसतानी मला पदोन्नतीने नियुक्ती पासुन वंचित ठेवण्यात आलेले आहे. माझ्यावर अन्याय झालेला आहे. सबब, माझ्या माहे जुलै पेड इन ऑगस्ट २०२३ चे वेतनातून एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करून देण्यास माझी सहमती नाही. माझे वेतनातून एक दिवसाचे वेतन कपात करण्यात येऊ नये.
—-
News Title | PMC Employees Promotion | Pune municipal employees refuse to pay one day’s salary due to pending promotion