PMC Employees Promotion | Arvind Shinde | प्रॉपर्टी टॅक्स खात्यातून बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा त्याच खात्यात बढती देऊ नये | अरविंद शिंदे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

HomeपुणेBreaking News

PMC Employees Promotion | Arvind Shinde | प्रॉपर्टी टॅक्स खात्यातून बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा त्याच खात्यात बढती देऊ नये | अरविंद शिंदे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

Ganesh Kumar Mule Oct 10, 2023 2:40 PM

City President | Pune Congress | कॉंग्रेसचा नवा शहर अध्यक्ष कोण?
Chhatrapati Shivaji Maharaj | छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी फक्त ठेकेदार आणि अधिकारी नाही तर राज्य व केंद्र सरकारवर सुध्दा गुन्हे दाखल करा | अरविंद शिंदे
Pune Congress | लोकशाही वाचविण्यासाठी सर्व निवडणुका बॅलेट पेपर वरती घेण्यात याव्‍यात | काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे

PMC Employees Promotion | Arvind Shinde | प्रॉपर्टी टॅक्स खात्यातून बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा त्याच खात्यात बढती देऊ नये | अरविंद शिंदे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

 
PMC Employees Promotion | Arvind Shinde | पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation) ज्या कर्मचाऱ्यांच्या कर आकारणी व कर संकलन कार्यालयातून (PMC Property Tax Department) अन्य खात्यात बदल्या झालेल्या आहेत. अशा सेवकांना बढती देताना / बढती दिल्यानंतर पुन्हा कर आकारणी कर संकलन कार्यालयात बढती देण्यात येऊ नये. अशी मागणी काँग्रेस शहर अध्यक्ष आणि माजी नगरसेवक अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. एखाद्या सेवकास कर आकारणी कर संकलन कार्यालयाकडे पुन्हा बढती दिली गेल्यास आम्ही त्याबाबतची तक्रार राज्य सरकारकडे करू. असा इशारा शिंदे यांनी दिला आहे. (Pune Municipal Corporation)

अरविंद शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रानुसार पुणे महानगरपालिकेच्या विविध कार्यालयामधील उप अधिक्षक ते अधिक्षक व अधिक्षक ते प्रशासन अधिकारी अशी बढ़ती समितीची बैठक 6 ऑक्टोबर रोजी घेण्यात आली. त्या बैठकीत विविध पदावर सेवकांना बढती देण्याचे अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही यापूर्वी महापालिका आयुक्त व अति.महा. आयुक्त ज, यांचेकडे ज्या सेवकांना एका खात्यात ३ वर्षापेक्षा जास्त काळ सेवा झाली आहे. अशा सेवकांच्या तात्काळ इतर खात्यात बदल्या करण्यात याव्यात असे वारंवार कळविले होते.  त्यानुसार पुणे महानगरपालिका प्रशासानाकडील विविध पदांवरील सेवकांच्या बदल्या केलेल्या आहेत. मात्र आम्हास मनपा वर्तुळातून प्राप्त माहितीनुसार असे समजते कि, बढती समितीची झालेल्या बैठकीत सेवकांना उप अधिक्षक ते अधिक्षक व अधिक्षक ते प्रशासन अधिकारी अशी बढती देण्यात येणार आहे. त्या बढती प्रक्रियेत ज्या सेवकांची  कर आकारणी व कर संकलन कार्यालयातुन अन्य खात्यात बदली झाली आहे अशा सेवकांना सुद्धा बढती देण्यात येणार आहे. (PMC Pune Employees)

शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे कि, बढती देण्यात येणाऱ्या सेवकांना पुन्हा कर आकारणी व कर संकलन कार्यालयातच येण्यास तीव्र इच्छुक असून ते सेवक येनकेन प्रकारे उदा. आर्थिक, राजकीय व इतर मार्गाने येण्याचा प्रयत्न करीत आहेत. आपणास आम्ही या पत्राद्वारे कळवित आहोत कि, ज्या सेवकांची कर
आकारणी व कर संकलन कार्यालयातून अन्य खात्यात बदल्या झालेल्या आहेत. अशा सेवकांना बढती देताना / बढती दिल्यानंतर पुन्हा कर आकारणी कर संकलन कार्यालयात बढती देण्यात येऊ नये. तरी आपणाकडून एखाद्या सेवकास कर आकारणी कर संकलन कार्यालयाकडे पुन्हा बढती दिली गेल्यास आम्ही त्याबाबतची तक्रार मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, प्रधान सचिव, नगरविकास विभाग यांचेकडे कारवाई करणेसाठी करणार आहोत याची गांभीर्याने दखल घेण्यात यावी. कोणत्याही सेवकावर अन्याय होणार नाही याची बढती देताना दक्षता घेण्यात यावी व त्याप्रकारे बढतीचे आज्ञापत्रक काढण्यात यावे. अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.