PMC Employees Ganpati | पुणे महापालिका सेवकवर्ग मंडळाचा “नागरी सेवा रथ” देखावा | आयुक्त नवल किशोर राम व त्यांच्या पत्नी यांचे हस्ते श्रीं ची प्राणप्रतिष्ठा!
Ganesh Chaturthi 2025 – (The Karbhri News Service) – पुणे महापालिका सेवकवर्ग गणेशोत्सवाचे यंदा ५२ वे वर्ष असून यंदाचे वर्षी पुणे महापालिका अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून मंडळाचा “नागरी सेवा रथ” देखावा सादर करण्यात आला आहे. (Pune PMC Ganeshotsav 2025)
मंडळाचे श्रीं ची प्राणप्रतिष्ठा महापालिका आयुक्त नवल किशोर राम व त्यांच्या पत्नी यांचे शुभहस्ते दु.११.३० वाजता संपन्न झाली. तसेच पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले यांचीही उपस्थिती लाभली.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष अशोक नटे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
मंडळाने या वर्षी शहरातील नागरिकांसाठी पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा आणि प्लास्टिक मुक्त पर्यावरण असा संदेश दर्शविणारा देखावा सादर केला आहे.
कला दिग्दर्शक क्षितिज रणधीर यांनी देखावा तयार केला आहे.


COMMENTS