PMC Employees Diwali Bonus | पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात सानुग्रह अनुदान (बोनस) आणि उचल जमा!

Homeadministrative

PMC Employees Diwali Bonus | पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात सानुग्रह अनुदान (बोनस) आणि उचल जमा!

Ganesh Kumar Mule Oct 25, 2024 9:21 AM

PMPML | Bonus | पीएमपीच्या कायम आणि बदली कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची मागणी | कर्मचारी संघटना आक्रमक
Police | Bonus | महाराष्ट्रातील पोलिस बांधवांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा |  भारतीय मराठा महासंघ
PMPML : Bonus : पीएमपीच्या १० हजार कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी २४ कोटी  : स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी  

PMC Employees Diwali Bonus | पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात सानुग्रह अनुदान (बोनस) आणि उचल जमा!

| महापालिका कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून दिवाळीची भेट

 

PMC Employees Diwali Bonus – (The Karbhari News Service) – महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना (PMC Employees and Officers) दिवाळी बोनस (Diwali Bonus) अर्थात सानुग्रह अनुदान आणि बक्षिसी दिली जाते. यंदा कर्मचाऱ्यांना च्या मूळ वेतन + महागाई भत्ता यावर ८.३३%+ २३,००० इतके सानुग्रह अनुदान दिले जाणार होते. त्यानुसार काल संध्याकाळी कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनस जमा झाला आहे. शिवाय याआधीच कर्मचाऱ्यांना उचल देखील देण्यात आली आहे. यामुळे कर्मचारी वर्गात खुशीचे वातावरण आहे.

वित्त व लेखा विभागाने (PMC Chief Account and Finance Department) ७ ऑक्टोबर ला बोनस बाबतचे परिपत्रक (Bonus Circular) जारी केले असून सर्व खात्यांना त्यानुसार सूचना केल्या होत्या. १८ ऑक्टोबर पर्यंत सर्व बिले तपासून घेण्यास सांगण्यात आले होते. दरम्यान दरवर्षी दिवाळी तोंडावर आल्यावर परिपत्रक काढले जाते. मात्र यंदा आधीच परिपत्रक काढून प्रशासनाने कर्मचाऱ्यांना दिलासा दिला होता. मात्र तरीही बोनस मिळत नव्हता. कर्मचाऱ्यांना अपेक्षा होती कि मागील शुक्रवारी बोनस मिळेल कारण शनिवार आणि रविवारी खरेदीला वेळ मिळेल. मात्र तसे न झाल्याने कर्मचारी नाराज होते. मात्र काल संध्याकाळी बोनस जमा झाल्याने कर्मचारी खुश आहेत. दरम्यान येत्या काही दिवसांत वेतन देखील होणार आहे. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (PMC Pune Diwali Bonus)

| यंदा दिली गेली २० हजाराची उचल

पुणे महापालिका (Pune Municipal Corporation Employees) कर्मचाऱ्यांना सणासाठी म्हणून १० हजाराची उचल रक्कम बिनव्याजी दिली (Festival Advance) जात होती. जी दहा समान हप्त्यात वसूल केली जाते. ही रक्कम आता २० हजार इतकी केली केली गेली आहे. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समिती (PMC Standing Committee) आणि मुख्य सभेने मान्यता दिली होती. त्यानंतर महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त विभागाने याबाबतचे सर्क्युलर जारी केले होते. त्यानुसार गेल्या आठवड्यात २० हजाराची उचल रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0