PMC Employees and Officers One Day Salary | पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकारी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली सुमारे पावणे तीन कोटींची देणगी!
Pune PMC News – (The Karbhari News Service) – राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत म्हणून पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर च्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणगी म्हणून उपलब्ध करून दिले गेले आहे. ही रक्कम जवळपास २ कोटी ७७ लाख इतकी आहे. अशी माहिती मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे यांनी दिली. (Maharashtra Flood)
राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत म्हणून राज्यातील शासनाचे सर्व अधिकारी/कर्मचारी यांचा सहभाग असावा या कर्तव्यभावनेने त्यांच्या ऑक्टोबर, च्या वेतनातून प्रत्येकी एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणगी म्हणून देण्याबाबत शासनाकडून आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत म्हणून पुणे महानगरपालिका व शिक्षण विभागाकडील अधिकारी / कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले गेले आहे. याबाबत प्रशासनाने परिपत्रक जारी केले होते.
एक दिवसाचे वेतन ऑक्टोबर पेड इन नोव्हेंबर, चे वेतनातून कपात केले गेले. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन + महागाई भत्ता मिळून होणा-या एकूण रकमेच्या आधारे गणना करून कपात करण्यात आली. ही रक्कम २ कोटी ७७ लाख ३० हजार ३४७ रुपये इतकी आहे.
–
राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत करण्याचे आवाहन राज्य सरकार कडून करण्यात आले होते. या आवाहनाला महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सुमारे पावणेतीन कोटींची रक्कम जमा केली आहे. याबद्दल सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांचे प्रशासनाकडून आभार.
- नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी .

COMMENTS