PMC Employees and Officers Agitation | महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे  काळ्या फिती लावून आंदोलन!

HomeBreaking Newsपुणे

PMC Employees and Officers Agitation | महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे काळ्या फिती लावून आंदोलन!

Ganesh Kumar Mule Sep 05, 2023 3:33 PM

Illegal Hoardings | 31 मे पर्यंत शहर अनधिकृत होर्डिंग मुक्त करण्याचा महापालिकेचा मानस | उपायुक्त माधव जगताप यांची माहिती
Pune | Traffic Congestion | गणेश मंडळाच्या मांडवाने वाहतूक कोंडी | कारवाई करण्याबाबत अतिक्रमण विभाग उदासीन  | मंडळांना 14 सप्टेंबर ची दिली होती मुदत 
Hawkers : PMC : हस्तांतरण शुल्क न भरणाऱ्या फेरीवाल्यांचा परवाना रद्द होणार!

PMC Employees and Officers Agitation | महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे  काळ्या फिती लावून आंदोलन!

PMC Employees and Officers Agitation |  पुण्येश्वर या शिवमंदिरावरुन (Punyeshwar Temple) पुण्यात राजकारण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्येश्वर मंदिराबाहेरील आतिक्रमणे हटवण्यात यावे म्हणून पुण्येश्वर पुनर्निर्माण समितीच्या (Punyeshwar Reconstruction Committee) वतीने पुणे महानगरपालिकेबाहेर (Pune PMC News) आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) आणि आमदार महेश लांडगे (MLA Mahesh Landge) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी दोन्ही आमदारांनी पालिका आयुक्त, अधिकारी व कर्मचारी यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र यावेळी पालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar), नगर अभियंता प्रशांत वाघमारे (Prashant Waghmare) यांचा एकेरी उल्लेख करण्यात आला. या वक्तव्याच्या निषेधार्थ पुणे महानगर पालिकाच्या आवारामध्ये पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून आंदोलन केले.

या आंदोलनामध्ये पालिकेतील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच पुणे महापालिका नगर अभियंता प्रशांत वाघमारे, अतिक्रमण अधिकारी माधव जगताप (Madhav Jagtap), पथ विभाग मुख्य अभियंता व्ही जी कुलकर्णी (V G Kulkarni) देखील उपस्थित होते. तसेच सर्व कर्मचारी संघटनांचे कर्मचारी आणि पदाधिकारी देखील सहभागी  झाले होते. (Pune Municipal Corporation)

आयुक्त यांचा  एकेरी उल्लेख केल्याबद्दल आंदोलनावेळी प्रशांत वाघमारे यांनी तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, “पुण्येश्वर मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटवण्यासाठी काही संघटनांनी आंदोलने केली.  हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. पण काल आंदोलनावेळी अधिकाऱ्यांबद्दल जी भाषा वापरण्यात आली ती योग्य नसून. मागील गेली अनेक वर्षे आम्ही अधिकारी म्हणून शहरामध्ये काम करत आहोत. एका रात्रीमध्ये शहराचा विकास झाला नाही तर अनेक वर्षे काम केल्यानंतर शहर प्रगती पथावर आले आहे. त्यामुळे अधिकारी असो वा अन्य कर्मचारी या कोणत्याही व्यक्तींबद्दल योग्य भाषा वापरली पाहिजे.” अशी मागणी प्रशांत वाघमारे यांनी केली. (PMC Pune)

शहराच्या मध्यवर्ती (Pune PMC News) भागामध्ये असणाऱ्या या पुण्येश्वर मंदिरावरुन काही संघटना राजकारण करत आहेत. मात्र हे प्रकारण न्यायालयामध्ये असून त्यावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी आंदोलन करण्यात आले.  आता पुण्येश्वर मंदिराबाबत पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांच्यासह अधिकारी वर्गासोबत  बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे प्रशांत वाघमारे म्हणाले. (Pune Municipal Corporation News)

रुपेश सोनावणे ( अध्यक्ष ), पुणे महानगरपालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटना यांनी देखील काल पुणे महानगरपालिका कर्मचारी याना करण्यात आलेल्या आरे रावी विरोधात जाहीर निषेध व्यक्त केला आहे.

——

News Title | PMC Employees and Officers Agitation | Municipal officers and employees protest by wearing black ribbons!