PMC Election Voting | महापालिका निवडणुकीसाठी उद्या सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान | ९३२ ठिकाणी ४०११ केंद्र!

Homeadministrative

PMC Election Voting | महापालिका निवडणुकीसाठी उद्या सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान | ९३२ ठिकाणी ४०११ केंद्र!

Ganesh Kumar Mule Jan 14, 2026 5:01 PM

PMC Vote Research | मतदार यादी बाबतची  आवश्यक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध | pmcvotersearch या  संकेतस्थळाचे अनावरण
NCP – Ajit Pawar | दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार म्हणून अजित दादांच्या राष्ट्रवादीला एकाकी ठेवले जातेय का?
BJP Shivsena on PMC Election | भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’ | शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

PMC Election Voting | महापालिका निवडणुकीसाठी उद्या सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान | ९३२ ठिकाणी ४०११ केंद्र!

 

PMC Election 2026 – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करिता ४१ प्रभागातून १६५ सदस्य निवडून देण्यासाठी एकूण ४०११ मतदान केंद्रावर उद्या १५ जानेवारी  रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान होणार आहे. (Pune Corporation Election Voting)

१) अंतिमरीत्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांबाबत माहिती (Contesting Candidates Info)

एकूण प्रभागांची संख्या –  ४१
एकूण सदस्य संख्या – १६५

• एकूण निवडणूक लढविणारे उमेदवार – ११५३ ( पुरुष ६२७, महिला -५२८)

• सर्वाधिक निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचा प्रभाग क्र. ६ – ( ४३ उमेदवार)

• सर्वात कमी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचा प्रभाग क्र. ३५- (५ उमेदवार)

• बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या २ (३५ ब व ३५ ड)
( १२/०१/२०२६ रोजी बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांचा प्रस्ताव मा. राज्य निवडणूक आयोगाकडे
मान्यतेस्तव सादर

 

२) मतदान केंद्रा बाबत माहिती-

एकूण मतदान केंद्रांची संख्या – ४०११

एकूण ठिकाणांची  संख्या – ९३२

• संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या – ९०६
• अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची संख्या – ००
• सर्वाधिक संवेदनशील मतदान केंद्र असणारे RO कार्यालय (सिंहगड – १७२ केंद्र)
• सर्वात कमी संवेदनशील मतदान केंद्र असणारे RO कार्यालय
• (शिवाजीनगर २१ केंद्र)
एकूण महिला मतदान केंद्र (पिंक बूथ) – १६
• एकूण आदर्श मतदान केंद्र- १४
• वेब कास्टिंग करण्यात येणाऱ्या मतदान केंद्रांची संख्या ८०२ (२०%)
• एकूण परदानशीन मतदान केंद्र – २२
• सोसायटी मधील मतदान केंद्र –  २५८ (सर्वाधिक वानवडी रामटेकडी – ६४, सर्वात कमी भवानी पेठ – 0)
• पत्राशेड असलेले मतदान केंद्र – १७०
पत्रा / कापडी पार्टीशन असलेले मतदान केंद्र ७४१
( सर्व मतदान केंद्रावर मा. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानूसार सुविधा (AMF) पुरविण्यात आलेले आहे.

३) मनुष्यबळाबाबत माहिती.
१) मतदान केंद्रावरील मनुष्यबळ – २५८९९
२) क्षेत्रिय अधिकारी (Zonal Officer) ४५४
३) एकूण नोडल अधिकारी – ३२ (एकूण नोडल अधिनस्त कर्मचारी-२४००)
४) आरोग्य कर्मचारी – १२००
५) मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचारी १०५६ – सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.)

४) मतदार चिठ्ठी वाटप (Voter Slip Distribution) –
प्रत्यक्ष वाटपास  ०८/०१/२०२६ पासून सुरुवात.
आज अखेर मतदार चिट्ठी वाटप ८५%

मतदारांना त्यांचे नाव मतदारयादीत शोधणेकरिता pmcvotersearch.digielection.com – सर्च इंजिन सुविधा

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: