PMC Election Voting Awareness | लोक कलेतून साकारला संसदीय लोकशाहीचा जागर | कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने मतदान जनजागृतीपर उपक्रम 

Homeadministrative

PMC Election Voting Awareness | लोक कलेतून साकारला संसदीय लोकशाहीचा जागर | कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने मतदान जनजागृतीपर उपक्रम 

Ganesh Kumar Mule Jan 12, 2026 7:34 PM

Fursungi TP Scheme | फुरसुंगी टीपी स्किमचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध करण्यास मुख्य सभेची मान्यता
Policy for property built up | PMC | फक्त आमदार, नगरसेवक सांगतात म्हणून मिळकत (property) नाही बांधता येणार 
PMC Deputy Commissioner | उपायुक्त माधव जगताप यांच्याकडे पुन्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची जबाबदारी | संदीप खलाटे यांच्याकडील पदभार काढला 

PMC Election Voting Awareness | लोक कलेतून साकारला संसदीय लोकशाहीचा जागर | कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने मतदान जनजागृतीपर उपक्रम

 

Kothrud Bavdhan Ward Office – (The Karbhari News Service)  – पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने माता जिजाऊच्या जयंती निमित्त ” पथनाटय व लोक कलेतून साकारला संसदीय लोकशाहीचा जागर” हा मतदान जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयच्या वतीने हा उपक्रम घेण्यात आला. (Pune PMC News)

जशी प्रत्येक पक्षाच्या उमेदवाराची प्रचाराची व मतदारांशी गाठीभेटीचीं रणधुमाळी चालू असताना दुसरीकडे प्रशासनाच्या वतीने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी व संसदीय लोकशाही टिकवण्यासाठी स्वीप कक्षाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या पथका मार्फत कोथरूड भागातील वाड्या, वस्त्या, सोसायट्या, सरकारी व निमसरकारी कार्यालय, विवाह सोहळे, स्नेह संम्मलेने, हास्य क्लब, नाट्यगृह, चित्रपटगृहे, चौका चौकात इत्यादी ठिकाणी जाऊन मतदार राजाच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेणे तसेच मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाच्या व महेश विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी “लोकशाहीचा जागर” या पथनाट्याद्वारे नागरिकांनी प्रत्येक निवडणूकीत १००% मतदान करणे किती महत्वाचे आहे व संसदीय लोकशाही व संविधान टिकवणे किती महत्त्वपूर्ण आहे हे पटवून दिले.

तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जीजामाता यांच्या जयंती निमित्त स्वीप कक्षाच्या वतीने आदरांजली अर्पण केली. छत्रपती संभाजी विद्यालय मनपा मुलींची शाळा क्रं. ४७, च्या मुख्याध्यापिका ज्योती मानकर व सह शिक्षिका भारती भदाणे लिखित “मी जिजाऊ बोलतीय” हे पथनाटय कु. अस्मिता भोसले, पिया कदम या विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेतून देशातील रयेतेच्या विकास व समृद्धीसाठी तसेच लोकांनी लोकांसाठी लोकांनी चालवलेले राज्य म्हणजे खरी लोकशाही आहे. छत्रपती शिवाजीराजे यांच्या लोक कल्याणकारी राज्याची महंती हीच खरी लोकशाही आहे या पथनाट्याद्वारे सादर केले. यासाठी देशातील तमाम रयतेनी मतदान करा असे आवाहन केले. याशिवाय सेवानिवृत्त सफाई सेवक महादेव जाधव यांनी भारूड व गायनाच्या लोक कलेद्वारे लोकशाहीचा जागर केला.

सदर जनजागृती कार्यक्रम मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुहास जाधव, तहसिलदार अंजली कुलकर्णी नायब तहसीलदार दर्शना सुर्यवंशी तसेच स्वीप कक्ष प्रमुख शिवाजी अडागळे, नोडल अधिकारी रामदास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती कार्यक्रम सकाळी ८.०० ते २.०० वा. दरम्यान राबवण्यात आला. लोककलेतून लोकशाहीचा जागर या मतदान जनजागृतीपर कार्यक्रमात मामासाहेब मोहोळ महाविद्यालयाचे ५०, महेश विद्यालयाचे ५०, सरस्वती विद्यामंदीर प्रशालेचे ६०, छत्रपती संभाजी शाळेतील १०० व त्या भागातील १०० असे एकूण ३६० मतदार नागरिक सहभागी झाले. लोकशाहीचा जागर या मोहिमेत मुख्य समन्वयक विजय पाटोळे, सहाय्यक समन्वयक वैजीनाथ गायकवाड यांनी मतदान जागृती विषयी मार्गदर्शन केले. तसेच अशोक कांबळे व आण्णा ढावरे यांनी मतदानाची शपथ दिली. प्रशांत पाटील, मनिषा वाघ, उमा मते यांनी मतदान जागृतीच्या घोषणा दिल्या. सदर जनजागृती मोहिमेत ३६० मतदार उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: