PMC Election Nominations | १२ हजार २२६ नामनिर्देशन फॉर्मची विक्री तर ३ हजार ४१ नामनिर्देशन पत्रे दाखल
PMC Election 2025-26 – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सन २०२५-२६ कार्यक्रम जाहीर झाला आहे. याकरिता ४१ प्रभागातून १६५ सदस्य निवडणुकीसाठी १५ निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत. १५ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांकडून ३० डिसेंबर पर्यंत एकूण १२ हजार २२६ नामनिर्देशन फॉर्मची विक्री करण्यात आली आहे. तर ३ हजार ४१ नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (Pune Corporation Election 2025-26)
१५ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडे २३ ते २९ ५पर्यंत एकूण ७४३ इतके नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते, तर आज रोजी सायंकाळी ०७.०० वाजेपर्यंत २२९८ नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आली.
येरवडा कळस धानोरी कार्यालय – १८२
नगर रोड -वडगाव शेरी कार्यालय – १४१
कोथरूड बावधन कार्यालय – १७४
औंध बाणेर कार्यालय – ११०
शिवाजीनगर घोले रोड कार्यालय – १४८
कै बा स ढोले पाटील रोड कार्यालय – १२२
हडपसर मुंढवा कार्यालय – २१३
वानवडी रामटेकडी कार्यालय – ८०
बिबवेवाडी कार्यालय – १६२
भवानी पेठ कार्यालय – २२४
कसबा विश्रामबाग वाडा कार्यालय – १६०
वारजे कर्वेनगर कार्यालय – १७१
सिंहगड रोड कार्यालय – १३४
धनकवडी सहकारनगर कार्यालय – १८३
कोंढवा येवलेवाडी कार्यालय – १०४
असे आज एकूण २२९८ नामनिर्देशन पत्रे दाखल करण्यात आलेली असून आज दुपारी ०३.०० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालनात उपस्थित असलेल्या उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात आलेली असून त्यांची प्राथमिक तपासणी सुरु आहे. आकडेवारी अंतरिम असून त्यात बदल होऊ शकतो.

COMMENTS