PMC Election EVM Machine | अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून EVM मशीन सिलींग तसेच कमिशनिंग याची पाहणी

Homeadministrative

PMC Election EVM Machine | अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून EVM मशीन सिलींग तसेच कमिशनिंग याची पाहणी

Ganesh Kumar Mule Jan 11, 2026 7:43 PM

Local Body Elections on Ballot Paper | नादुरुस्त मतदान यंत्रे नकोत | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या
Pune Congress | लोकशाही वाचविण्यासाठी सर्व निवडणुका बॅलेट पेपर वरती घेण्यात याव्‍यात | काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे
Prashant Jagtap Hadapsar Vidhansabha | हडपसर विधानसभा मतदारसंघात पुन्हा मतमोजणी? EVM मशीन व VVPAT पडताळणीसाठी प्रशांत जगताप यांचा अर्ज

PMC Election EVM Machine | अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून EVM मशीन सिलींग तसेच कमिशनिंग याची पाहणी

 

PMC Election Voting – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी  कसबा विश्रामबाग वाडा या कार्यालयामार्फत सुरु असलेले  EVM मशीन सिलींग तसेच कमिशनिंग याची पाहणी केली. (PMC Pune News)

 

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, यांचे आदेशानुसार पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सन २०२५-२६ कार्यक्रम जाहीर झाला आहे. याकरिता ४१ प्रभागातून १६५ सदस्य निवडणुकीसाठी १५ निवडणूक निर्णय अधिकारी यांची कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत.

त्या अनुषंगाने निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी गणेश कला क्रीडा रंगमंच येथे मतदान साहित्य छपाई व वितरण व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. तसेच न्यू इंग्लिश स्कूल टिळकरोड याठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी,  कसबा विश्रामबाग वाडा या कार्यालयामार्फत सुरु असलेले  EVM मशीन सिलींग तसेच कमिशनिंग याची पाहणी करण्यात आली. यावेळी  उपायुक्त निवडणूक  प्रसाद काटकर,  उपायुक्त  तुषार बाबर,  मुख्य कामगार अधिकारी  नितीन केंजळे, सहायक आयुक्त  सोमनाथ आढाव व सहायक आयुक्त  कैलास केंद्रे इ. अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: