PMC Election Draft Voter List 2025 | ४१  प्रभागांत ३५  लाख ५१ हजार ४६९ मतदार | प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

Homeadministrative

PMC Election Draft Voter List 2025 | ४१  प्रभागांत ३५  लाख ५१ हजार ४६९ मतदार | प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

Ganesh Kumar Mule Nov 20, 2025 4:24 PM

Stray Pigs | PMC Pune | मोकाट डुकरे आता पुणे महापालिकेची संपत्ती होणार!  | नागरिक किंवा व्यावसायिकांचा अधिकार राहणार नाही 
Dipali Dhumal | पाणी पुरवठा विभागामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या नोटीसा थांबवाव्या | माजी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांची मागणी
Traffic congestion in Pune | पुणे शहरातील वाहतुक कोंडीवर मात करण्यासाठी आराखडा तयार करा | उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

PMC Election Draft Voter List 2025 | ४१  प्रभागांत ३५  लाख ५१ हजार ४६९ मतदार | प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

 

PMC Election 2025 – (The Karbhari News Service) – राज्य निवडणूक आयोगा च्या  आदेशातील मार्गदर्शक तत्वानुसार  गुरुवार  रोजी पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीकरिता तयार करण्यात आलेली प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार 41 प्रभागांमध्ये एकूण मतदार 35 लाख 51 हजार 469 आहेत. अशी माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. (Pune Corporation Election 2025)

 

यादीनुसार सर्वात जास्त मतदार हे प्रभाग ९ मध्ये म्हणजे १ लाख ६० हजार २४२ इतके आहेत. तर सर्वात कमी मतदार हे प्रभाग ३९ मध्ये म्हणजे ६२ हजार २०५ इतके आहेत. प्रभाग ३८ मध्ये १ लाख ४८ हजार ७६९ मतदार, प्रभाग ४ मध्ये १ लाख २४ हजार ६६७ मतदार, प्रभाग ४१ मध्ये १ लाख १९ हजार १६७ मतदार आहेत.

प्रारूप मतदार यादीवर  नोव्हेंबर 20 नोव्हेंबर  ते  27 नोव्हेंबर  या कालावधीमध्ये हरकती व सूचना दाखल करून घेण्यात येणार आहेत.

प्रारूप मतदार यादीवर दाखल हरकतींवर निर्णय घेऊन प्रभाग घेणार अंतिम मतदार यादी दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

 

| मतदाराने घ्यावयाच्या हरकतींचे प्रकार-

– स्वतः मतदाराने केलेले अर्ज – ज्या मतदाराचे नाव चुकीच्या प्रभागात समाविष्ट झालेले असेल त्यांनी नमुना हरकत अर्ज दाखल करणे आवश्यक आहे
– इतर मतदाराने एक किंवा अनेक विशिष्ट मतदाराबाबत घेतलेले हरकत- ज्या तक्रारदारास अन्य मतदाराबाबत हरकत घ्यायची आहे त्यांनी नमुना ब मध्ये मतदाराचे तपशील, त्याचे रहिवासाचे पुरावे तसेच यादी भाग क्रमांकाची प्रत जोडून अर्ज करणे आवश्यक आहे.
– एकच सहकारी गृहनिर्माण संस्थेत राहणाऱ्या एकापेक्षा अधिक मतदारांचे नमुना मधील अर्ज त्या संस्थेच्या अध्यक्ष किंवा सचिव यांच्यामार्फत त्या संस्थेच्या लेटरहेडवर संबंधित सचिव किंवा अध्यक्षाच्या स्वाक्षरीने एकत्रितपणे सादर करता येतील.
– कोणत्याही परिस्थितीत एक गठ्ठा पद्धतीने किंवा एकत्रित यादीच्या स्वरूपात हरकती दाखल करता येणार नाहीत व असे अर्ज विचारात घेणे आवश्यक असणार नाही.

| प्रभागातील मतदार संख्या

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: