PMC Election 2025-26 | ४१ प्रभागांमध्ये ४०१२ मतदान केंद्र निश्चित | मतदान केंद निहाय मतदार यादी तयार करण्याची कार्यवाही सुरु

Homeadministrative

PMC Election 2025-26 | ४१ प्रभागांमध्ये ४०१२ मतदान केंद्र निश्चित | मतदान केंद निहाय मतदार यादी तयार करण्याची कार्यवाही सुरु

Ganesh Kumar Mule Dec 22, 2025 9:55 PM

Maharashtra State Election Commission | निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी – राज्य निवडणूक आयुक्त
Water problem of Baner Balewadi | बाणेर बालेवाडी च्या गंभीर पाणी प्रश्ना बाबत महापालिका अधिकारी निष्क्रिय | अमोल बालवडकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकाऱ्यांचे  ४ ते ५ तास ठिय्या आंदोलन
PMC Employees promotion | महापालिकेच्या ७२ कर्मचाऱ्यांची शाखा अभियंता पदावरून उप अभियंता पदावर पदोन्नती!

PMC Election 2025-26 | ४१ प्रभागांमध्ये ४०१२ मतदान केंद्र निश्चित | मतदान केंद निहाय मतदार यादी तयार करण्याची कार्यवाही सुरु

| महापालिका प्रशासनाची माहिती

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी पुणे महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा युद्ध पातळीवर काम करीत असून, पूर्णपणे सज्ज आहे.  एकूण ४१ प्रभागांमध्ये ४०१२ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. अंतिम मतदार यादी नुसार मतदान केंद निहाय मतदार यादी तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation – PMC)

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने १५ निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असून, १५ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी १, १५ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी २, १५ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ३ यांची देखील नियुक्ती करण्यात आली असून, सर्व कार्यालयांची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

निवडणूक कामकाजाच्या अनुषंगाने एकूण २२ कक्ष स्थापन करण्यात आले असून, त्यानुसार नोडल ऑफिसर १५ नेमण्यात आले आहेत. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे स्तरावर देखील २२ काक्षांकारिता नोडल अधिकारी नेमण्यात आलेले आहेत.

उमेदवारांना पुणे महानगरपालिकेकडील विविध विभागांचे ना-हरकत थकबाकी प्रमाणपत्र देण्याकरिता पुणे मनपाने संगणक प्रणाली उपलब्ध करून दिलेली असून, उमेदवारांना एकाच ठिकाणी अर्ज करून किंवा online पद्धतीने देखील ना-हरकत थकबाकी प्रमाणपत्र प्राप्त करता येत आहे. उमेदवारांना प्रचाराकरिता आवश्यक असलेले विविध परवाने (वाहन परवाना, तात्पुरते प्रचार कार्यालय, कोपरा/जाहीर सभा इत्यादी ) करिता एक खिडकी कक्ष प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात स्थापन करण्यात येत आहेत. या  प्रक्रिया अधिक सोपी होण्याकरिता संगणक प्रणाली बाबत कार्यवाही सुरु आहे.

कायदा व सुव्यस्था राखणेच्या अनुषंगाने सद्यस्थितीत पोलीस विभागाकडून १६० पोलिसांची नियुक्ती करण्यात येत आहे. त्याबाबत पोलीस विभागास कळविणेत आले आहे.
मतदान केंद्रावरील केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी १,२,३ नुसार आवश्यक सुमारे २३ हजार कर्मचा-यांचे नियुक्ती आदेश पारित करण्यात आले आहेत. सर्व ठिकाणी strong रूम, मतदान साहित्य वाटप व स्वीकृती केंद्र या ठिकाणांची निश्चिती संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांचे मार्फत तयार करण्यात येत आहे.  असे प्रशासना कडून सांगण्यात आले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: