PMC Education Department | गुणवंत शिक्षकांवरच शिक्षण विभागाची मदार | मुरलीधर मोहोळ
PMC Education Department – (The Karbhari News Service) – शिक्षण विभाग पुणे महानगरपालिकेच्या शताब्दी वर्षा निमित्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ पुणे शहर च्या वतीने गुणवंत आदर्श शिक्षक,यशवंत शाळा व गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळा तसेच नूतन कार्यकारणीचा सत्कार समारंभ सहकार व नागरी वाहतूक उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते करण्यात आला. (Pune Municipal Corporation)
कार्यक्रमात शिक्षण विभागाच्या शंभर वर्षांच्या कार्याचा मागोवा घेणारी ध्वनिचित्रफीत तसेच प्राथमिक शिक्षक संघटनेच्या कार्याची माहिती देणारी ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली.कार्यक्रमात पुणे मनपातील शिक्षक म्हणून काम केलेले आणि आता महाराष्ट्र शासकीय सेवांमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत असलेले हरून आतार यांना कै.रघुनाथ शिरगावे यांच्या स्मरणार्थ टीचर्स आयडॉल 2024 पुरस्कार प्रदान आला.
शिक्षण संघाचे माजी अध्यक्ष हे नाना तापकीर यांच्या स्मरणार्थ विद्यार्थी प्रिय शाळा 2024 हा पुरस्कार विद्यानिकेतन शाळा क्रमांक 19 धनकवडी, संघनिष्ठ योद्धा कैलासवासी गोविंद भिलारे यांच्या स्मरणार्थ यशवंत प्राथमिक शाळा पुरस्कार विद्यानिकेतन शाळा क्रमांक 16, संघनिष्ठ कोविड योद्धा कै.विठ्ठल गोपाळ यांच्या स्मरणार्थ यशवंत उच्च प्राथमिक शाळा 2024 हा पुरस्कार विद्यानिकेतन शाळा क्रमांक 4 तसेच 25 शिक्षकांना गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार,शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
सदर प्रसंगी शिक्षण संघटनेच्या वतीने शिक्षण मंडळ सदस्य ते केंद्रीय मंत्री असा प्रवास करणाऱ्या संघटनेच्या मार्गदर्शक ना .मा. मुरलीधर अण्णा मोहोळ केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार यांचा ह भ प गणेश महाराज भगत लिखित सन्मानपत्र देऊन संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला .सदर कार्यक्रमात नामदार मुरलीधर मोहोळ यांनी शिक्षण विभाग तसेच प्राथमिक शिक्षक संघटनेच्या कार्याचे कौतुक केले.नुतन कार्यकारणीस शुभेच्छा दिल्या.महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेचे न.पा व म.न्.पा चे राज्याध्यक्ष मा. सचिन डिंबळे यांनी शिक्षण विभाग मनपा तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटने ने एकत्रित केलेल्या कार्याची माहिती दिली. शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष सुधीर जानजोत ,माजी अध्यक्ष संगीता तिवारी यांनीही उपस्थितास मार्गदर्शन केले. मावळते अध्यक्ष श्री नितीन वाणी आणि महिला अध्यक्ष मिलन गुरव जंगम यांच्याही कार्याचा सन्मान करून नूतन कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमास मा आमदार भीमराव अण्णा तापकीर, पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या उपायुक्त मा आशा राऊत मॅडम,शिक्षण विभागाचे माजी अध्यक्ष मा. सुधीर जानजोत, मा. संगीता ताई तिवारी,मा. प्रदीप धुमाळ.मा वासंती काकडे,मा. मंजुश्री खर्डेकर ,मा.विजय उर्फ आप्पा रेणूसे तसेच माजी माजी उपाध्यक्ष रवींद्र अण्णा माळवदकर मा.,नरेंद्र व्यवहारे ,मा नुरुद्दीन सोमजी, मा.कालिंदीताई पुंडे , क्रीडाप्रमुख माणिक देवकर खूप मोठ्या प्रमाणात शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षक संघ,पुणे शहर अध्यक्ष राहुल सुतार यांनी केले सूत्रसंचालन सौ.रुबिना शेख यांनी केले, आभार प्रदर्शन वर्षा उगलमुगले यांनी केले.
COMMENTS