PMC Draft Ward Structure 2025 | राजकीय सोयीची प्रभाग रचना | शिवसेना नेते प्रशांत बधे यांचा आरोप
PMC Election 2025 – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका निवडणूकीची प्रभाग रचना तयार करताना आपण दिलेल्या मार्गदर्शक सूचनेचा पूर्णपणे भंग करून राजकीय सोयीची प्रभाग रचना पूर्ण केलेली आहे. असा आरोप शिवसेना नेते (UBT) प्रशांत बधे यांनी केला आहे. तसेच यावरून कोर्टात जाण्याचा इशारा देखील बधे यांनी महापालिका आयुक्त यांना दिला आहे. (Pune PMC Election 2025)
बधे यांच्या निवेदन नुसार प्रभाग रचना तयार करताना आयुक्त यांनी राज्य निवडणूक आयोगाला सादर करावी असे पहिले परिपत्रक होते. त्या परिपत्रकात बदल करून आयुक्त यांनी प्रथम नगर विकास विभागाला प्रभाग रचना सादर करायची त्यावर नगर विकास विभाग तपासणी करणार आणि तो राज्य निवडणूक आयोगाला सादर करणार असा बदल केला. 74 व्या घटना दुरुस्ती मध्ये राज्य निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र निपक्षपाती यंत्रणा देशाच्या संसदेने उभी केली राजकीय हस्तक्षेपापासून दूर राहून याचे कामकाज चालावे यासाठी परंतु सरकारने कायद्यामध्ये बदल करून राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार स्वतःकडे घेतले आणि त्यात मनमानी बदल केले त्यामुळे आमची मागणी आहे की आयुक्ताने नगर विकास विभागाने सादर केलेला नकाशा नगर विकास विभागाने त्यात केलेले बदल आणि त्या बदलासह आपल्याकडे सादर केलेला नकाशा या तिन्ही गोष्टी जाहीर केल्या पाहिजेत. असे बधे यांनी म्हटले आहे. राजकीय आणि प्रशासकीय हस्तक्षेप प्रभाग रचना तयार करताना झाला असा आमचा स्पष्ट आरोप आहे.
नगर विकास विभागाकडे तांत्रिक टीम नाही. प्रभाग रचना करताना उत्तरे कडून पूर्वे कडू उत्तर दिशे कडून (north east) आणि पश्चिम दिशेस जायचे आणि शेवट दक्षिण दिशा इथे शेवट करायचा असे निवडणूक आयोगाने सूचित केले होते.
पुण्याचा विचार केला तर पुणे शहराची प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाने दिलेली आहे त्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे केली तर पुणे शहराच्या पश्चिमेकडून (खडकवासला धरणातून) पूर्वेकडे (मांजरी गावातून पुढे) मुठा नदी वाहते व पुण्याच्या पूर्वेकडून ( महाळुंगे, बालेवाडी, बाणेर, औंध, बोपोडी, कळस, खडकी कॅन्टोन्मेंटला वळसा घालून संगमवाडी पर्यंत) मुळा नदी वाहात येऊन शहराच्या मध्यभागी संगमवाडीत या दोन नद्यांचा संगम होऊन पुढे या दोन्ही नद्या एकत्रित होऊन पूर्वेकडे मांजरी गावातून पुढे जातात त्यामुळे पुणे महानगरपालिका हद्दीचे भौगोलिक दृष्ट्या तीन भाग होतात त्याप्रमाणे खालील प्रमाणे पुणे महानगरपालिका हद्दीचे तीन भाग होऊन
प्रभाग रचना होऊ शकेल. असे बधे यांनी म्हटले आहे.
१) मुळा आणि मुठा नदीच्या वरती पुणे मनपा नवीन हद्दी सह ५ लाख ६७ हजार ८५७ इतकी लोकसंख्या असून त्यात वडगावशेरी आणि शिरूर विधानसभा मतदार संघातील वाघोली गावाचा भाग अंतर्भूत होतो ही प्रभाग रचना उत्तर पूर्व या मार्गदर्शक सूचनेनुसार करावी लागेल, यात २०११ च्या जनगणनेनुसार ६ प्रभाग ४ सदस्यांचे होतील.
२) मुळा नदी खाली आणि मुठा नदीच्या वरती मनपाच्या नवीन हद्दी सह ९ लाख,१ हजार,३३ (९०१०३३) यात शिवाजीनगर, कोथरूड, मुळशी-भोर आणि खडकवासला विधानसभा मतदार संघाचा काही भाग समाविष्ट होतो, यात एकूण १० प्रभाग निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे उत्तर पश्चिम असे होऊ शकतात.
३) मुठा नदी खाली नवीन हद्दी सह २० लाख १५ हजार ९२० लोकसंख्या असून यात २४ प्रभाग ४ सदस्यांचे होणार आणि शेवटचा १ प्रभाग ५ सदस्यांचा होईल
अशी २५ प्रभागांची रचना होईल. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे दक्षिण-पूर्व दिशेने ही रचना असेल यात कसबा, कॅन्टोन्मेंट, हडपसर, पुरंदर, पर्वती आणि खडकवासला या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. असे सर्व मिळून ४१ प्रभाग होतील
(४० प्रभाग ४ सदस्यांचे व १ प्रभाग ५ सदस्यांचा असे एकूण १६५ सदस्य)
सध्या पुणे महानगरपालिकेने सादर केलेली प्रारूप प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वा प्रमाणे नाही.
प्रभागाच्या सीमा रेषा आखताना नैसर्गिक हद्दी विचार घेतल्या नाहीत उदाहरणार्थ मोठे रस्ते, नद्या, नाले, डोंगर, रेल्वे रूळ हे ओलांडून प्रभाग केले आहेत प्रभाग रचना करताना भौगोलिक दृष्ट्या प्रभागाची व्याप्ती प्रचंड मोठी झाली आहे तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्या वस्त्यांची शक्यतेवर विभाजन करू नये असे आयोगाचे निकष असताना सुद्धा काही प्रभागात वस्त्याच्या वस्त्या वगळून टाकल्या आहेत दोन-तीन प्रभाग तीन तीन विधानसभा मतदारसंघात विभागले गेले आहेत त्या प्रभागात काम करताना प्रशासकीय अडचणींना तोंड द्यावे लागणार एक प्रभाग दोन-तीन क्षेत्रिय कार्यालयात विभागला गेला आहे
पुण्याची संपूर्ण प्रारूप प्रभाग रचना तपासून खात्री करून घ्यावी संपूर्ण शहराची प्रभाग रचना तयार करताना कशा पद्धतीने मार्गदर्शक तत्त्वाचा भंग केलेला आहे याचा एक सविस्तर अहवाल आणि नकाशे प्रत्यक्ष सुनावणीच्या वेळेला दाखल करू. आयुक्त पुणे मनपा यांनी तयार केलेला प्रभाग रचनेचा नकाशा त्या नकाशावर नगर विकास विभागाने केलेले बदल त्यानंतर त्या नकाशावर निवडणूक आयोगाने केलेले बदल या तिन्ही गोष्टी मिळाल्यानंतर पुन्हा हरकत नोंदवण्याचा आमचा अधिकार राखून ठेवून ही हरकत नोंदवत आहे. असे बधे यांनी म्हटले आहे.

COMMENTS