PMC Draft Ward Structure 2025 | प्रारूप प्रभाग रचनेचे पुणे महापालिका वेबसाईट (PMC Website) वरून जवळपास 60 हजार लोकांनी नकाशे केले डाऊनलोड!

Homeadministrative

PMC Draft Ward Structure 2025 | प्रारूप प्रभाग रचनेचे पुणे महापालिका वेबसाईट (PMC Website) वरून जवळपास 60 हजार लोकांनी नकाशे केले डाऊनलोड!

Ganesh Kumar Mule Sep 01, 2025 4:24 PM

Appointment | PMC Pune | आरोग्य विभागात मानधन तत्वावर काम करणाऱ्या 75 कर्मचाऱ्यांची महापालिकेत कायमस्वरूपी नियुक्ती 
Budget Provision | यंदा तरी 15 मार्च पर्यंत बिले सादर करा! | तरतूद लॅप्स झाल्यास खातेप्रमुख जबाबदार
PMC Kamgar Union | कामगार युनियन कडून चतुर्थ श्रेणी कामगारांना दाखवण्यात आला मराठी चित्रपट

PMC Draft Ward Structure 2025 | प्रारूप प्रभाग रचनेचे पुणे महापालिका वेबसाईट (PMC Website) वरून जवळपास 60 हजार लोकांनी नकाशे केले डाऊनलोड!

| पुणे महापालिकेच्या वेबसाईटवर सकारात्मक प्रतिसाद

 

PMC Website – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना २२ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी  महानगर पालिकेच्या हद्दीत एकूण ४१ प्रभाग असणार आहेत. यात ४० प्रभाग चार सदस्यीय तर एक प्रभाग पाच सदस्यीय असेल. प्रभागाचे नकाशे क्षेत्रीय कार्यालय स्तरावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच ऑनलाइन म्हणजे महापालिका वेबसाईटवर देखील हे नकाशे उपलब्ध आहेत. महापालिकेच्या वेबसाईटला या रचनेमुळे चांगला प्रतिसाद मिळाला असून हजारो लोकांनी वेबसाईट वरून नकाशे डाऊनलोड केले आहेत. अशी माहिती महापालिकेच्या संगणक विभागाचे सिस्टिम मॅनेजर राहूल जगताप (Rahul Jagtap PMC) यांनी दिली. (Pune Municipal Corporation (PMC) Election- 2025)

पुणे महापालिका निवडणुकी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. तसेच त्यावर नागरिकांना हरकती आणि सूचना देण्यासाठी ४ सप्टेंबर पर्यंत कालावधी देण्यात आला आहे. त्यानुसार नागरिकांनी प्रतिसाद देणे सुरू केले आहे. मात्र इतर कुठल्या प्रभाग पेक्षा प्रभाग १५ म्हणजे मांजरी बुद्रुक साडेसतरा नळी  आणि प्रभाग ३४ नर्हे वडगाव बुद्रुक या दोन प्रभागातून सर्वात जास्त हरकती-सूचना प्रशासनाकडे आल्या आहेत. तर आतापर्यंत ४०० हून अधिक हरकती आणि सूचना आल्या आहेत.

राहूल जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार महापालिका प्रशासनाने प्रभाग रचनेचे नकाशे ऑफलाईन सोबत ऑनलाइन देखील उपलब्ध करून दिले आहेत. नागरिक डिजिटल माध्यमाचा चांगला वापर करत असलेले दिसून येत आहे. कारण महापालिका वेबसाईट ला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच प्रभाग रचना जाहीर झाल्यापासून आतापर्यंत जवळपास ६० हजार नकाशे डाऊनलोड केले गेले आहेत. राज्यातून पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई तसेच नागपूर सारख्या शहरातून हे नकाशे डाऊनलोड केले गेले आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त पुणे शहरातून म्हणजे ५१ हजार आणि त्या खालोखाल पिंपरी चिंचवड मधून ८ हजार नकाशे डाऊनलोड करण्यात आले आहेत.

निवडणूक आयोगाच्या वेळापत्रक नुसार ४ सप्टेंबर पर्यंत नागरिकांच्या हरकती आणि सूचना घेतल्या जातील. ५ ते १२ सप्टेंबर या कालावधीत हरकती सूचनांवर सुनावणी घेतली जाईल. त्यासाठी शासनाच्या प्राधिकृत अधिकारी नेमका जाईल. त्यानंतर १३ ते १५ सप्टेंबर या कालावधीत या हरकती सूचनावरील शिफारशी लक्षात घेऊन अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाईल. शासनाचे प्राधिकृत अधिकारी महापालिका आयुक्त यांच्या मार्फत अंतिम प्रभाग रचना नगर विकास विभागाकडे सादर करतील. त्यानंतर ६ ऑक्टोबर पर्यंत राज्य निवडणूक आयोग अंतिम प्रभाग रचना अधिसूचने द्वारे प्रसिद्ध करतील.
—-

प्रभाग रचनेच्या माध्यमातून पुणे महापालिकेच्या वेबसाईटला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोक डिजिटल माध्यमाचा चांगला वापर करत असलेले देखील त्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. प्रभाग रचनेचे नकाशे डाऊनलोड करण्यात नागरिकांना महापालिकेच्या वेबसाइट वर कुठलीही अडचण आली नाही. महापालिका बेबसाईट चा नागरिकांना फायदा होत असलेला दिसून येत आहे.

राहूल जगताप, सिस्टीम मॅनेजर, पुणे महापालिका. 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: