PMC Deputy Commissioner Transfer | उपायुक्त सचिन इथापे आणि अजित देशमुख यांची बदली 

HomeBreaking Newsपुणे

PMC Deputy Commissioner Transfer | उपायुक्त सचिन इथापे आणि अजित देशमुख यांची बदली 

गणेश मुळे Feb 16, 2024 4:29 PM

Pune Property Tax | PT-3 application deadline is 30th November | Relief for Pune residents
PMC Property Tax Department | पुणे महापालिका मिळकतकर विभागाचा कारवाईचा धडाका | एकाच दिवशी 8 कोटी 82 लाख थकबाकी असलेल्या 40 मिळकती केल्या सील
Meditations | Shri Shivkripanand Swami | योग द्वारेच ‘वसुधैव कुटुम्बकम” ची परिकल्पना साकार होणे संभव | परम पूज्य श्री शिवकृपानंद स्वामीजी

PMC Deputy Commissioner Transfer | उपायुक्त सचिन इथापे आणि अजित देशमुख यांची बदली

| राज्य सरकारकडून आदेश जारी

PMC Deputy Commissioner Transfer | पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation (PMC) प्रतिनियुक्ती (Deputation) वर आलेले सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे (Sachin Ithape) आणि कर संकलन व कर आकारणी विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त अजित देशमुख (Ajit Deshmukh) यांची सरकारकडून बदली करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर या बदल्या सरकारकडून करण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारच्या वतीने लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील 41 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यात पुणे महापालिकेत असणाऱ्या या दोघांचा समावेश आहे. या दोघांच्या प्रतिनियुक्तीच्या सेवा संपुष्ठात आणल्या आहेत. सचिन इथापे यांची सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर इथे उपविभागीय अधिकारी या रिक्त पदावर नियुक्त करण्यात आले आहे. तर अजित देशमुख यांना उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मुंबई शहर या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.

– अजित देशमुख यांचा सरकारनेच वाढवला होता कालावधी

पुणे महापालिकेचे कर आकारणी आणि कर संकलन विभाग प्रमुख (PMC Property Tax Department) तथा उपायुक्त अजित देशमुख (Deputy Commissioner Ajit Deshmukh) यांना पुणे महापालिकेत (PMC Pune) नुकतीच एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होता. देशमुख यांचा कार्यकाळ 15 डिसेम्बर 2023 ला समाप्त होत होता. 15 डिसेंबर 2020 ला देशमुख हे पुणे महापालिकेत रुजू झाले होते. त्यांना पुणे महापालिकेत 3 वर्ष झाली होती. त्यामुळे  काम करण्यासाठी त्यांनी सरकारकडे कालावधी वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार सरकारने त्यांना 1 वर्षाची मुदतवाढ दिली होती. मात्र कालावधी संपण्याच्या आतच त्यांची बदली करण्यात आली आहे.
देशमुख यांनी मिळकतकर विभागाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात काम केले. त्यांची कामाचे चांगले कौतुक झाले होते. कारण घनकचरा विभागात त्यांनी घनकचऱ्याचे व्यवस्थित व्यवस्थापन केले होते. तसेच वेगवेगळे प्रकल्प देखील यशस्वी करून दाखवले. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी त्यांना मिळकत कर विभागाची जबाबदारी दिली. तिथेही त्यांनी चांगले काम करून दाखवत महापालिकेला चांगले उत्पन्न मिळवून दिले.

– उपायुक्त इथापे यांच्या काळात भरती प्रक्रिया यशस्वी

उपायुक्त सचिन इथापे हे महापालिकेत सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त म्हणून रुजू झाल्यापासून त्यांच्या काळात खूप चांगले निर्णय घेतले गेले. खासकरून महापालिकेतील दोन भरती प्रक्रिया त्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळल्या आणि यशस्वी करून दाखवल्या. कारण महापालिकेतील भरती प्रक्रिया बऱ्याच काळापासून रखडल्या होत्या. त्यांच्या या कामाचे चांगलेच कौतुक झाले.