PMC Deputy Commissioner | कर आकारणी आणि कर संकलन विभाग आता रवी पवार यांच्याकडे, अरविंद माळी यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन तर आशा राऊत यांच्याकडे मध्यवर्ती भांडार विभाग
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत नुकतेच तीन उपयुक्त आणि यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली होती. मात्र महापालिका आयुक्त यांनी त्यातील फक्त दोघांनाच रुजू करून घेतले आहे. आयुक्तांनी आशा राऊत आणि तुषार बाबर यांना रुजू करून घेतले तर संतोष टेंगले यांना मात्र रुजू केले नाही. दरम्यान आता आयुक्तांनी पुन्हा सर्व उपायुक्त यांना विभाग वाटून दिले आहेत. यात काही बदल देखील करण्यात आले आहेत. त्यानुसार आता कर आकारणी आणि कर संकलन विभाग उपायुक्त रवी पवार यांच्याकडे, अरविंद माळी यांच्याकडे माधव जगताप यांच्याकडील आपत्ती व्यवस्थापन तर आशा राऊत यांच्याकडे मध्यवर्ती भांडार विभाग देण्यात आला आहे. याबाबत आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून जारी करण्यात आले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)
उपायुक्त प्रसाद काटकर हे महापालिका आयुक्त यांचे OSD अर्थात विशेष कार्यकारी अधिकारी तसेच असणार आहेत. त्यांच्याकडील हा कार्यभार संतोष टेंगले यांना देण्याच्या हालचाली होत्या. दरम्यान सोमनाथ बनकर यांना अतिक्रमण आणि बांधकाम निर्मूलन विभाग देण्यात आला आहे. दरम्यान उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्याकडील प्रॉपर्टी टैक्स विभाग काढून घेतल्याने महापालिका अधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याची चर्चा पुन्हा या निमित्ताने पाहायला मिळत आहे. चांगले काम चालले असताना कार्यभार का काढून घेतला जावा? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
असे असेल अधिकाऱ्यांचे कामकाज
प्रसाद काटकर – १) परिमंडळ क्र. ३ विभाग २) निवडणूक विभाग (३) महापालिका आयुक्त यांचे विशेष कार्यकारी अधिकारी (OSD)
२) सोमनाथ बनकर – १) अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग
३) प्रशांत ठोंबरे – १) मालमत्ता व व्यवस्थापन विभाग २) दक्षता विभाग
४) विजय लांडगे – १) स्थानिक संस्था कर विभाग २) जनगणना विभाग ३) जनरल रेकॉर्ड
५) किशोरी शिंदे – १) परिमंडळ १ २) उपायुक्त प्रशासन अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय ) उप आयुक्त (विशेष) विभाग ४) मुद्रणालय विभाग
६) रवि पवार – १) कर आकारणी व कर संकलन विभाग २) महात्मा फुले वाडा आरक्षित क्षेत्राचे संपादनचे कामकाज ३) क्रीडा विभाग
७) माधव जगताप – १) आकाशचिन्ह व परवाना विभाग २) अग्निशमन विभाग
८) जयंत भोसेकर – १) समाज कल्याण विभाग २) समाज विकास विभाग ३) मागासवर्ग विभाग ४) तक्रार निवारण अधिकारी (दिव्यांग)
९) संदीप खलाटे – १) झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन २) पुणे मनपा वसाहती ( चाळ विभाग)
१०) संदीप कदम – घनकचरा व्यवस्थापन विभाग
११) वसुंधरा बारवे – १) प्राथमिक शिक्षण विभाग २) माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभाग संनियंत्रण (३) प्रशिक्षण प्रबोधिनी
१२) विजयकुमार थोरात – १) सामान्य प्रशासन विभाग २) तांत्रिक विभाग ३) बीओटी सेल
१३) संतोष वारुळे – १) परिमंडळ क्र. २ विभाग २) सांस्कृतिक केंद्र विभाग
१४) अरविंद माळी – १) परिमंडळ क्र. ४ विभाग २) आपत्ती व्यवस्थापन विभाग
१५) अविनाश सकपाळ- १) मोटार वाहन विभाग २) पर्यावरण विभाग
१६) निखील मोरे – भूसंपादन व व्यवस्थापन विभाग, परिमंडळ क्र ५
१७) राहुल जगताप, ई- प्रशासक ( प्रभारी पदभार ) – माहिती तंत्रज्ञान विभाग
१८) श्री. रमेश शेलार (मुख्य सुरक्षा अधिकारी) – सहाय्यक अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग प्रमुख, उप आयुक्त यांच्या अधिनिस्त कामकाज करणे.
१९) आशा राऊत – १) मध्यवर्ती भांडार विभाग २) सुरक्षा विभाग सनियंत्रण
२०) तुषार बाबर – १) माहिती व जनसंपर्क विभाग २) सोशल मीडिया कक्ष ३) मंडई विभाग

COMMENTS