PMC Deputy Commissioner | पुणे महापालिकेत अजून एक उपायुक्त प्रतिनियुक्तीने! | राज्य सरकारकडून आदेश जारी

HomeपुणेBreaking News

PMC Deputy Commissioner | पुणे महापालिकेत अजून एक उपायुक्त प्रतिनियुक्तीने! | राज्य सरकारकडून आदेश जारी

गणेश मुळे Aug 05, 2024 6:27 AM

Dr Ambedkar Jayanti 2024 | PMC | आंबेडकर जयंतीच्या तयारीच्या निमित्ताने 13 एप्रिल च्या मध्यरात्री पर्यंत का कामे करत बसता? | महापालिका आयुक्तांचा अधिकाऱ्यांना परखड सवाल
PMC Additional Commissioner | अतिरिक्त महापालिका आयुक्त यांच्याकडील कामकाज व्यवस्थेत बदल!
Pune Traffic | PMC Pune | आगामी दोन महिने बांधकाम, पथ विभागातील सर्वच अभियंत्यांना रस्त्यांवर तैनात करा | आबा बागुल यांची महापालिका आयुक्ताकडे मागणी 

PMC Deputy Commissioner | पुणे महापालिकेत अजून एक उपायुक्त प्रतिनियुक्तीने! | राज्य सरकारकडून आदेश जारी

PMC Officers – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation- PMC) राजेंद्र कुमार जाधव (Rajendra Kumar Jadhav) यांची प्रतिनियुक्तीने (Deputation) उपायुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून याबाबतचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत. (Pune PMC News)
मागील आठवड्यात एकूण ५ उपायुक्त प्रतिनियुक्तीने महापालिकेत नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर आता जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जाधव हे सातारा जिल्ह्यातील वाई येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.

– महापालिका आयुक्तांची कसरत

दरम्यान या आधी नियुक्त केलेल्या उपायुक्त यांना अजून कुठले खाते देण्यात आले नाही. कारण यातील काही उपायुक्त हे आम्हाला हेच खाते किंवा विभाग हवा म्हणून वरिष्ठ राजकीय स्तरावरून फिल्डिंग लावून आहेत. त्यामुळे खातेवाटप करण्या बाबत महापालिका आयुक्त संभ्रमावस्थेत आहेत.
तसेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तीन वर्ष कालावधी पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांची बदली करण्याचे आदेश भारतीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. यानुसार काही अधिकारी बदलीस पात्र होतात. असे असूनही हे अधिकारी विविध विभाग मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.