PMC Cultural Center Department | ‘हर घर तिरंगा‌’ उपक्रमाअंतर्गत पुणे महापालिका माजी सैनिकांचा करणार गौरव

Homeadministrative

PMC Cultural Center Department | ‘हर घर तिरंगा‌’ उपक्रमाअंतर्गत पुणे महापालिका माजी सैनिकांचा करणार गौरव

Ganesh Kumar Mule Aug 11, 2025 7:54 PM

Har Ghar Tiranga | बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण भागात ११,००० तिरंगा वाटपाचा संकल्प | अमोल बालवडकर फाऊंडेशनचा उपक्रम
Har Ghar Tiranga | महापालिका खरेदी करणार 5 लाख तिरंगा ध्वज! | 85 लाखांचा येणार खर्च | मेडिकल कॉलेजच्या कामातून  वर्गीकरण केले जाणार 
Har Ghar Tiranga | हर घर तिरंगा अभियानातून राष्ट्रीयता आणि एकात्मता वाढविण्याचा प्रयत्न करणार |  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

PMC Cultural Center Department | ‘हर घर तिरंगा‌’ उपक्रमाअंतर्गत पुणे महापालिका माजी सैनिकांचा करणार गौरव

 

Har Ghar Tiranga – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेतर्फे बुधवार  रोजी माजी सैनिकांचा गौरव केला जाणार आहे. यावेळी देशभक्तीपर गीतांचा ‌‘माँ तुझे सलाम‌’ विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

पुणे महानगरपालिकेने आयोजित केलेल्या ‌‘हर घर तिरंगा‌’या उपक्रमाअंतर्गत तसेच महापालिकेच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय सेनेमध्ये शौर्य गाजविणाऱ्या माजी सैनिकांचा सन्मान/ गौरव करणेचा कार्यक्रम बुधवार, १३ ऑगस्ट  रोजी सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. माजी सैनिकांचा सन्मान/ गौरव मा.महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते करण्यात येणार असून अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी., एम. जे. प्रदीप चंद्रन, ओमप्रकाश दिवटे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.या निमित्ताने देशभक्तीपर हिंदी, मराठी गीतांचा ‌‘माँ तुझे सलाम‌’ हा विशेष कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांची असून सूत्रधार निकिता मोघे आहेत. तर केतकी महाजन-बोरकर संयोजन करीत आहेत. जितेंद्र भुरुक, गणेश मोरे, अश्विनी खुरपे, आकाश सोळंकी गीते सादर करणार असून रशिद शेख, सुनील जाधव, बाबा खान, रोहित जाधव, सोमनाथ फाटक, सुनील साळवी साथसंगत करणार आहेत.

कार्यक्रम महापालिकेच्या सांस्कृतिक केंद्र विभागातर्फे आयोजित करण्यात आला आहे. पुणेकर रसिकांसाठी कार्यक्रम विनामूल्य आयोजित करण्यात आला असून रसिकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त सुनील बल्लाळ आणि प्रशासन अधिकारी राजेश कामठे यांनी केले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: