PMC CSR | कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबीलिटी (CSR) अंतर्गत म.न.पा. लोहगाव शाळांचे नूतनीकरण व उद्घाटन समारंभ संपन्न
PMC Education Department – (The karbhari News Service) – कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबीलिटी अंतर्गत म.न.पा. लोहगाव शाळांचे नूतनीकरण व उद्घाटन समारंभ संपन्न झाला. (Pune PMC News)
लोहगाव मधील शाळा क्रमांक एक व शाळा क्रमांक दोन ह्या शाळा जिल्हा परिषद शाळेमध्ये असताना शाळेची ना दुरावस्था होती, शाळेचा खिडक्या शाळेचे दरवाजे तसेच खेळणी साहित्य नादुरुस्त अवस्थेत असून, शाळेच्या इमारतीचा रंगही उदास झालेला होता, तसेच स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शाळेमध्ये येण्याचा कल कमी असून,अजूनही भरपूर समस्या असल्यामुळे शाळेची अवस्था खराबच होती.
काही दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिका शेजारील ग्रामपंचायत ह्या पुणे महानगरपालिके अंतर्गत वर्ग झाल्या, त्यामध्ये शाळा ही वर्ग झाल्या. शाळांच्या अवस्था बघून थिंकशार्प फाउंडेशन यांच्या मदतीने शाळांची पाहणी करून घेतली. कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या अंतर्गत या शाळेचे रंगरूप बदलण्याचा निर्णय घेतला, एस.एल.बी. इंडिया कंपनीला प्रस्ताव दिल्यानंतर कंपनीनेही सकारात्मक निर्णय देऊन शाळेच्या कामकाजाला सुरुवात केली.
इमारती मध्ये छोट्या-मोठ्या सर्व दुरुस्त्या करून घेतल्या ,मुलींचे व मुलींचे बाथरूम दुरुस्त करून घेतले, दरवाजे बेसिन बसून घेतले बाथरूम व वर्गावरील पावसाळ्यात छत गळती होत होती,तीही दुरुस्त करून घेतली. विद्यार्थ्यांना पिण्याच्या पिण्यासाठी पाच वॉटर फिल्टर बसवण्यात आले तसेच, प्रत्येक रूम मध्ये चार ट्यूबलाइट आणि दोन फॅन बसवण्यात आले.पाणी स्टोरेज होण्यासाठी तीन टाक्या बसवण्यात आल्या जेणेकरून मुलांना मुबलक प्रमाणात पाणी मिळेल,विद्यार्थ्यांचे खेळणी साहित्य दुरुस्त करण्यात आले, त्यामुळे मुलांचे शाळेतील उपस्थिती पट वाढला, डिजिटल क्लासरूम करण्यात आले असून त्यामध्ये पहिली ते सातवी शैक्षणिक सिल्याबस टाकण्यात आला व मुलांना ब्लॅकबोर्ड सारखा पण पॅनलवर वापर करता येतो,विद्यार्थ्यांना सायन्स प्रॅक्टिकल करण्यासाठी स्टेम लॅब बनवण्यात आली त्यामुळे पुस्तकातील प्रात्यक्षिक मुले स्टेम लॅब मध्ये करतात, प्रत्येक क्लासरूम मध्ये अभ्यासक्रमाच्या संबंधित दोन ऍक्रेलिक बोर्ड बसवण्यात आले.
सोईस्कर इमारतीत जाण्यासाठी पायऱ्यांवरती हॅन्डग्रीप बसवले
पूर्ण इमारतीला रंगकाम केले तसेच बाला पेंटिंग करून शाळेच्या भिंती बोलक्या केल्या मुलांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे,कंपाउंड वॉल वरती तारांचे कुंपण करण्यात आले
मुलांना खेळण्यासाठी शालेय मैदान दुरुस्त करण्यात आले, प्रत्येक वर्गामध्ये वाचन कोपरा तयार केला आहे त्यामुळे मुले अवांतर वाचनाकडे कल वाढला आहे,परसबाग तयार केली परसबागेतील भाजीपाला घेऊन आनंदाने डब्बा बनवून आणतात व सर्व विद्यार्थी मिळून त्याचा स्वाद घेताना,शाळा क्रमांक एक मुलांची व शाळा क्रमांक दोन मुलींची दोन्ही शाळेमध्ये फुल टाइम सफाई कर्मचारी देण्यात आले.शाळेच्या परिसरातील अंगणवाडीमध्ये पण रंगकाम लाईट फिटिंग करून भौतिक सुविधा सुधार केला.विद्यार्थ्यांचे व पालकांची सभा घेऊन मार्गदर्शन करण्यात आले पालकांना पाल्यासाठी योग्य मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातो.
शाळेचे कामकाज पाहून भवन विभागाकडून सीसीटीव्ही तसेच अग्निशामक पाईपलाईन करून दिली.
अशा विविध भौतिक सुविधांचा थिंक शार्प फाउंडेशन व एस एल बी इंडिया कंपनीकडून मोठे योगदान आपल्या शाळेला देण्यात आले.
आज सोमवार दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून श्रीमती.आशा राऊत (उपायुक्त शिक्षण विभाग) एस एल बी इंडिया कंपनीचे अधिकारी तसेच थिंकशार्प फाउंडेशनचे अधिकारी शिक्षक पालक वर्ग विद्यार्थी सर्वांचे उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला
COMMENTS