PMC Contract Employees Bonus | मनपा कंत्राटी कामगारांना तत्काळ बोनस द्या |   सहाय्यक कामगार आयुक्त यांचे महापालिका आयुक्तांना आदेश 

Homeadministrative

PMC Contract Employees Bonus | मनपा कंत्राटी कामगारांना तत्काळ बोनस द्या |   सहाय्यक कामगार आयुक्त यांचे महापालिका आयुक्तांना आदेश 

Ganesh Kumar Mule Oct 24, 2024 8:39 PM

Good news for PMC Employees | अखेर कालबद्ध पदोन्नतीच्या प्रस्तावाला आयुक्तांची मान्यता! महापालिका कर्मचाऱ्यांना दिलासा
Biometric Machine | PMC Pune | बायोमेट्रिक हजेरीसाठी महापालिका कर्मचाऱ्यांना लावाव्या लागताहेत रांगा |मशीन अचानक बंद पडत असल्याने कर्मचारी त्रस्त
India’s First Girls’ School Groundbreaking for National Monument!

PMC Contract Employees Bonus | मनपा कंत्राटी कामगारांना तत्काळ बोनस द्या |   सहाय्यक कामगार आयुक्त यांचे महापालिका आयुक्तांना आदेश

 

Sunil Shinde RMS – (The Karbhari News Service) – कंत्राटी कामगारांना तात्काळ बोनस द्यावा असा महत्वपूर्ण निर्णय आज कामगार उपायुक्त कार्यालय पुणे येथील सहाय्यक कामगार आयुक्त निखिल वाळके (Nikhil Walake) यांनी दिला. कामगार उपायुक्त कार्यालयामध्ये पुणे मनपा मधील कंत्राटी कामगारांना बोनस देण्यात यावा या संदर्भामध्ये राष्ट्रीय मजदुर संघ(RMS) यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर सुनावणी घेण्यात आली. या सुनावणी वेळी बोनस न देण्याबाबत मनपाकडून कोणतेही ठोस कारण देण्यात आलेले नाही. सन 2022-23 करता मनपा कंत्राटी कामगारांना बोनस द्यावे असे आदेश 3 नोव्हेंबर 2023 रोजी पत्राद्वारे कामगार उपायुक्त पुणे यांनी दिले होते. (Pune Municipal Corporation – PMC)

आज कामगार उपायुक्त पुणे यांनी स्पष्टपणे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांना लेखी पत्राद्वारे पुणे महापालिकेतील सर्व कंत्राटदारांना बोनस देण्याचे आदेश संबंधित कंत्राटदारांना द्यावे असे पत्र दिले आहे. यामुळे आता सर्व कंत्राटी कामगारांना बोनस देण्याबाबत महानगरपालिकेला निर्णय घेणे भाग पडणार आहे. या संदर्भामध्ये आज राष्ट्रीय मजदुर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष सिताराम चव्हाण, सेक्रेटरी एस के पळसे, संघटक विशाल बागुल, कंत्राटी कामगारांचे प्रतिनिधी उज्वल साने, रमेश भोसले, अरविंद आगम, सरिता धुळेकर, प्रकाश इंदोरिकर, विनायक देगावकर हे उपस्थित होते. महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन कामगार उपयुक्त यांनी दिलेल्या आदेशाची प्रत देण्यात आली.

यावेळी  राजेंद्र भोसले यांनी याबाबत आपण सकारात्मक असून आचारसंहितेमुळे सदरचे निर्णय करणे बाबत योग्य मार्गदर्शन घेऊन तसा निर्णय करण्याचे आश्वासन दिले आहे. या संदर्भात राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी बोनस हा कायद्याचा भाग असून कायद्याची अंमलबजावणी करण्याचा भाग आहे. त्याचा आचारसंहितेशी कोणताही संबंध येणार नाही त्यामुळे बोनस हा दिवाळीपूर्वी सर्व कंत्राटी कामगारांना दिला पाहिजे अशी मागणी आयुक्त यांच्यासमोर समोर केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0