PMC Contract Employees Bonus | महापालिकेतील कंत्राटी कामगारांना बोनस देण्याची मागणी

Homeadministrative

PMC Contract Employees Bonus | महापालिकेतील कंत्राटी कामगारांना बोनस देण्याची मागणी

Ganesh Kumar Mule Oct 23, 2024 7:48 PM

Bonus | contract workers | मनपा कंत्राटी कामगारांना सानुग्रह अनुदान देण्यास प्रशासन सकारात्मक | कामगार नेते सुनील शिंदे यांची माहिती
PMPML : Bonus : पीएमपीच्या १० हजार कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी २४ कोटी  : स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी  
PMPML | Bonus | पीएमपीच्या कायम आणि बदली कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची मागणी | कर्मचारी संघटना आक्रमक

PMC Contract Employees Bonus | महापालिकेतील कंत्राटी कामगारांना बोनस देण्याची मागणी

 

Pune Municipal Corporation- (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेतील ठेकेदारांकडील कंत्राटी कामगारांना सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील बोनस अदा करण्याची मागणी पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत संघटनेकडून महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. (Pune PMC News)

संघटनेच्या निवेदनानुसार पुणे महानगरपालिकेतर्फे विकास प्रकल्पांची कामे व देखाभाल दुरूस्ती निविदेव्दारे कंत्राटी कामगारामार्फत करण्यात येतात अशा कंत्राटी कामगार (नियमन व निर्मुलन) अधिनियम १९७० मधील तरतुदींची परिणामकारक अंमलबजावणीसाठी कार्यालयीन आदेश निर्गमित करण्यात आले आहे.
त्यानुषंगाने संबंधित विभागांनी कार्यवाही करणे आवश्यक आहे.

ज्या विभागांनी ठेकेदारामार्फत कंत्राटी कामगारांची सेवा घेतली आहे अशा कंत्राटी कामगारांना बोनस प्रदान अधिनियम १९६५ मधील तरतुदीनसार संबंधित कंत्राटी कामगारांचे मुळ भत्ता + • विशेष भत्ता दोन्ही मिळून २१०००/- पेक्षा कमी असल्यास व एका वर्षाच्या कालावधीत ३० दिवसांपेक्षा जास्त काम केले असल्यास सदर कंत्राटी कामगारांना बोनस देणे बंधनकारक आहे.

त्या अनुषंगाने ज्या विभागाकडून कंत्राटी कामाबाबतची निविदा प्रक्रिया राबविताना सदर कामामध्ये बोनसची रक्कम समाविष्ठ करण्यात आली आहे, अशा कामावरील कंत्राटी कामगारांना बोनस देणे क्रमप्राप्त आहे. ज्या ठेकेदाराकडून त्यांचेकडील कंत्राटी कामगारांना महिनेमहा वेतनातून बोनस आदा करण्यात येतो. त्यांना सदर बाब लागू नाही. काही ठेकेदाराकडून त्यांचेकडील कामगारांना महिनेमहा वेतनातून बोनस न देता वार्षिक एकवट स्वरूपात आदा करण्यात येतो. त्या ठेकेदारांनी त्यांचेकडील कामगारांना बोनस देणे अनिवार्य आहे.

तरी पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागातील कंत्राटी कामगारांना बोनस प्रदान अधिनियम १९६५ मधील तरतुदीनुसार कंत्राटी कामगारांना सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षातील बोनस अदा करणे बाबत संबंधितांना आदेश द्यावेत. अशी मागणी संघटनेने आयुक्ताकडे केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0