PMC Contract Employees Bonus | बोनस मिळण्याचा निर्णय होईपर्यंत आमरण उपोषण सुरु राहणार | कामगार नेते सुनील शिंदे

HomeपुणेBreaking News

PMC Contract Employees Bonus | बोनस मिळण्याचा निर्णय होईपर्यंत आमरण उपोषण सुरु राहणार | कामगार नेते सुनील शिंदे

कारभारी वृत्तसेवा Nov 01, 2023 12:53 PM

Prohibitory order | जयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश
BJP Vs Mahavikas Aaghadi | कंत्राटी पद्धत हे महाविकास आघाडीचे पाप | धीरज घाटे
MLA Sunil Tingre | पुणे एअरपोर्ट ते विश्रांतवाडी व फाईव्ह नाईन ते नागपूरचाळ या नव्याने बनविण्यात येणारा रोडचा शुभारंभ आमदार सुनिल टिंगरे यांच्या हस्ते संपन्न

PMC Contract Employees Bonus | बोनस मिळण्याचा निर्णय होईपर्यंत आमरण उपोषण सुरु राहणार | कामगार नेते सुनील शिंदे

 

PMC Contract Employees Bonus | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) कंत्राटी कामगारांच्या बोनस, अनुदान व इतर प्रश्नांच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कामगार नेते व राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे (Sunil Shinde) यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले. (PMC Contract Employees Bonus)

आज सकाळी महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले यांना पुष्पांजली अर्पण करून सुनील शिंदे यांनी उपोषण आंदोलन सुरू केले. आज दिवसभर या आंदोलनाला महानगरपालिकेतील कंत्राटी सुरक्षारक्षक, पाणीपुरवठा, कीटकनाशक, हॉस्पिटल, स्मशानभूमीतील कंत्राटी कामगार, कंत्राटी चालक अशा विविध खात्यातील कंत्राटी कामगारांनी पाठिंबा दिला. सकाळपासून सुमारे 300 कामगार या आंदोलनामध्ये सहभागी झाले. यावेळी कामगार एकजुटीची गाणी, तसेच बोनस आमच्या हक्काचा, आमचाच लढा न्यायासाठी अशा घोषणाही देण्यात आल्या. दिवसभरामध्ये प्रशासनाकडून मात्र या आंदोलनाची कोणती दखल घेण्यात आली नाही.

कामगार विभागाचे अतिरिक्त कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी दूरध्वनी द्वारे सुनील शिंदे यांच्याशी संपर्क साधला व प्रश्न समजावून घेतले. या संदर्भामध्ये त्यांच्या कार्यालयाकडून कामगार अधिकारी व इन्स्पेक्टर पाठवून प्रकरणाची चौकशी करून लवकरात लवकर कामगारांना न्याय देऊ असे आश्वासन त्यांनी दिले. आज या ठिकाणी कोणताही निर्णय न झाल्याने कामगार नेते सुनील शिंदे यांनी जोपर्यंत प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण आंदोलन चालू आहे, असे सांगितले. या आंदोलनामध्ये संघटनेचे उपाध्यक्ष सीताराम चव्हाण, एस के पळसे, त्याचबरोबर संघटनेचे विविध कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.