PMC Commissioner Vikram Kumar | पुणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी पुणेकरांना केले हे आवाहन 

HomeपुणेBreaking News

PMC Commissioner Vikram Kumar | पुणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी पुणेकरांना केले हे आवाहन 

Ganesh Kumar Mule Jul 13, 2023 4:20 PM

PMC Budget By IAS Vikram Kumar | अंदाजपत्रकातील महापालिका आयुक्तांनी केलेलं निवेदन | पुणे शहराविषयी आयुक्तांना काय वाटते? वाचा सविस्तर
PMC Employees Time Bound Promotion | कालबद्ध पदोन्नती बाबत महापालिका कर्मचाऱ्यांना आयुक्तांचा दिलासा! | मात्र चर्चा करण्याचे सामान्य प्रशासन विभागाला आदेश
PMC Chief Finance and Account Officer | उल्का कळसकर यांच्याकडील अतिरिक्त पदभार कमी केला! | महापालिका आयुक्तांकडून आदेश जारी

PMC Commissioner Vikram Kumar | पुणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार यांनी पुणेकरांना केले हे आवाहन

PMC Commissioner Vikram Kumar |पुणेकर नागरिकांनी (Punekar) आपल्या आरोग्याची काळजी (Helath Care) घेणे बाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार  (IAS Vikram Kumar) यांचेकडून आवाहन करण्यात आले आहे. (PMC Commissioner Vikram Kumar)

पुणे मनपा (Pune Municipal Corporation) तर्फे नागरिकांना संसर्गजन्य आजार (Infectious Disease) होऊ नयेत म्हणून आवाहन करण्यात येते कि पावसाळ्यामुळे पिण्याचे पाणी (Drinking Water)  काही कारणामुळे दुषित झाल्यास कॉलरा, टायफाईड, गस्ट्रो,डीसेंट्री, कावीळ अश्या आजारांचा प्रामुख्याने प्रादुर्भाव होतो तसेच उघड्यावरील पदार्थावर माश्या बसून दुषित झाल्यास उलट्या, जुलाब अश्या प्रकारचे आजार होतात. सर्व साधारणपणे पावसाळ्यामध्ये अश्या आजारांचे प्रमाण वाढते, या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महानगरपालिके मार्फत आवश्यक काळजी घेतली जाते. पुणे म.न.पा.च्या नळावाटे पुरवठा होणाऱ्या पाण्याचे शहराच्या विविध भागात नमुने घेऊन तपासणी केली जाते. त्यामध्ये आवश्यक क्लोरिनचे योग्य प्रमाण राखले जाते. उघड्यावरील खाद्य पदार्थ आरोग्य खात्यामार्फत कारवाई करून नष्ट केले जातात. नागरिकांनी याबाबत आरोग्य दृष्ट्या खालील प्रमाणे काळजी घेणे आवश्यक आहे.

 

1. नागरिकांनी महानगरपालिकेच्या नळावाटे होणाऱ्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा बोअर वेल, कॅनॉल शुद्धीकरण न केलेल्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करू नये.
2. सार्वजनिक ठिकाणी उदा. शाळा, कॉलेजेस यांना पुरविण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीची सफाई करण्यात यावी.
3. प्रत्येक नागरिकांने वैयक्तिक स्वछतेचे पालन करावे.
4. उलट्या-जुलाब, विषमज्वर बगेरे आजार झाल्यास उपचार करून घ्यावेत सर्व महानगरपालिकेच्या दवाखान्यात आणि डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयामध्ये उपचाराची सोय उपलब्ध आहे.
5. पिण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी उकळून घेऊन पिण्यासाठी वापरण्यात यावे.
6. नागरिकांनी आपल्या घरातील व सभोवतालचा परिसर स्वछ ठेवावा, ओला व सुका कच-याचे नियमित वर्गीकरण करून ओल्या कच-यावर भ्यास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करावी किंवा घंटागाडीमध्ये यावा आणि सुका कचरा पुणे महानगरपालिकेने नेमलेल्या कचरा गोळा करणाऱ्या महिला अथवा
खाजगी स्वयंसेवी संस्थेकडे जमा करावा आणि परिसर स्वछ राहील अशी काळजी घ्यावी.
7. डास चावल्यामुळे होणाऱ्या मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया या रोगांसाठी प्रतिबंधात्मक उपाय कीटक प्रतीबंधक विभागामार्फत केले जातात याबाबत नागरिकांनी क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी क्षेत्रीय कार्यालये यांचेशी संपर्क साधावा.
8. सर्व हॉसिंग सोसायटीमधील संपवेल व पिण्याच्या पाण्याच्या टाकीची सफाई करून घेण्यात यावी.
9. शिळे किंवा उघड्यावरचे माश्या बसलेले अन्न खाऊ नयेत, तसेच अन्न पदार्थ व्यवस्थित झाकून ठेवावेत. हातगाड्यावर उपड्यावर विकले जाणारे खाद्य पदार्थ खाऊ नयेत.
10. सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांचेकडे उपचारास आलेल्या कॉलरा, टायफाईड रास्ट्री, डीसेंट्री, कावीळ रुगांची माहिती आरोग्य खात्यास कळवावी.
11. जेथे लेबर कॅम्प आहे त्या ठिकाणच्या सर्व बांधकाम व्यावसायिकांनी पुणे महानगरपालिकेच्या नळावाटे पुरविलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. जलजन्य आजार होऊ नयेत याबाबत सर्व कामगारांना सूचना देऊन दक्षता घ्यावी.
12. बापरात नसलेले टायर्स झाकून ठेवणे / त्यांची विल्हेवाट लावणे.
13. कूलर्स रेफ्रीजरेटर यातील पाणी आठवड्यातून किमान एकदा बदलणे,
14.  पूर्ण अंग झाकेल अश्या कपड्यांचा वापर करावा.
15. पाण्याचे साठे आठवड्यातून किमान एकदा रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा वापरणे व पाण्याचे साठे झाकून ठेवणे. घरभोवताली नारळाच्या करवंट्या रिकाम्या बादल्या इत्यादी नायनाट करणे.


News Title | PMC Commissioner Vikram Kumar Pune Municipal Commissioner and Administrator Vikram Kumar appealed to the people of Pune