PMC Commissioner Bungalow | शहर अभियंत्यांचा चौकशी अहवाल तातडीने संकेतस्थळावर प्रसिद्ध करा | विवेक वेलणकर यांची आयुक्तांकडे मागणी 

Homeadministrative

PMC Commissioner Bungalow | शहर अभियंत्यांचा चौकशी अहवाल तातडीने संकेतस्थळावर प्रसिद्ध करा | विवेक वेलणकर यांची आयुक्तांकडे मागणी 

Ganesh Kumar Mule Nov 17, 2025 7:35 PM

The Karbhari Impact | महापालिका आयुक्त आणि महापौर बंगला स्वच्छता प्रकरण | महापालिका आयुक्तांनी प्रशासनाकडून मागवला खुलासा  | ‘द कारभारी’ वृत्तसंस्थेच्या बातमीचा परिणाम 
Mahavikas Aghadi With MNS | महापालिका आयुक्त बंगला प्रकरणा वरून मनसे च्या मदतीला धावली महाविकास आघाडी! 
Sanitation | बंद असलेला महापौर बंगला आणि आयुक्त बंगल्याच्या स्वच्छतेसाठी 25 लाखाचा खर्च!

PMC Commissioner Bungalow | शहर अभियंत्यांचा चौकशी अहवाल तातडीने संकेतस्थळावर प्रसिद्ध करा | विवेक वेलणकर यांची आयुक्तांकडे मागणी

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका आयुक्त बंगल्यातील अनेक किमती वस्तू गहाळ झाल्यासंदर्भात शहर अभियंत्यांचा चौकशी अहवाल तातडीने संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा,अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (Vivek Velankar Sajag Nagrik Manch)

याबाबत वेलणकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार  जून महिन्यात महापालिका आयुक्त निवासातील किमती वस्तू गहाळ झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शहर अभियंत्यांना यासंदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. आज पाच महिन्यांनी यासंदर्भातली माहिती मला ३ ते ५ च्या माहिती अधिकारात पहायची आहे असे मी शहर अभियंत्यांना आज सकाळी कळवले. त्यांनी अतित्वर्यतेने यासंदर्भातील अहवाल तयार करुन गोपनीय असे म्हणून आपल्याकडे पाठवला आणि मला तसे सांगितले. त्यानंतर मी आपल्याला दुपारी चार वाजता समक्ष भेटून ३-५ च्या माहिती अधिकारात तो अहवाल पाहण्यास मिळावा अशी विनंती केली. आपण माझी विनंती नाकारताना अजून तो अहवाल आपणच बघितला नसल्याने तो देता येणार नाही असे सांगितले. प्रत्यक्ष महापालिका आयुक्त बंगल्यातील‌ किमती वस्तू गहाळ होण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर आणि आपण त्यासंदर्भात चौकशीचे आदेश दिल्यानंतरही हा विषय गांभीर्याने न घेता शहर अभियंत्यांनी चौकशीसाठी पाच महिने का घेतले याचा खुलासा मागणे आवश्यक आहे. असे वेलणकर यांनी म्हटले आहे.


या अहवालात गोपनीय काय आहे हे अनाकलनीय आहे. प्रत्यक्ष आयुक्त बंगल्यातील वस्तू गहाळ होत असतील तर तो सामान्य पुणेकरांसाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे या विषयात कोणतीही गोपनीयता न बाळगता तो अहवाल तातडीने महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी. जेणेकरुन भविष्यात असे प्रकार होणार नाहीत.

| विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: