PMC  commercial Property Tax | हॉस्टेल, पेईंग गेस्ट मिळकतींवर बिगर घरगुती दराने आकारण्यात येणाऱ्या करास विरोध

HomeपुणेBreaking News

  PMC  commercial Property Tax | हॉस्टेल, पेईंग गेस्ट मिळकतींवर बिगर घरगुती दराने आकारण्यात येणाऱ्या करास विरोध

कारभारी वृत्तसेवा Dec 18, 2023 2:23 PM

PMC Employees Diwali Bonus | पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात सानुग्रह अनुदान (बोनस) आणि उचल जमा!
How to Care Your Eyes | तुम्ही तासंतास स्क्रीनवर काम करता | पण डोळ्यांची काळजी घेता का? | हे तुम्ही करायलाच हवे
Prithviraj Chavan Congress | निवडणूक रोखे व अन्य माध्यमातून जमा पैशाचा पश्‍चिम महाराष्ट्रात भाजपाकडून मोठ्या प्रमाणात वापर |  पृथ्वीराज चव्हाण यांचा पत्रकार परिषदेत गंभीर आरोप

  PMC  commercial Property Tax | हॉस्टेल, पेईंग गेस्ट मिळकतींवर बिगर घरगुती दराने आकारण्यात येणाऱ्या करास विरोध

| स्थायी समितीतील प्रस्ताव मागे घेण्याची माजी सभागृह नेते निलेश निकम यांची मागणी

PMC Commercial Property Tax | हॉस्टेल, पेईंग गेस्ट याचा वापर करण्याच्या व मासिक भाडे आकारणाऱ्या मिळकतींना बिगर घरगुती दराने कर आकारण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समिती (PMC Standing Committee) समोर ठेवला आहे. यास माजी सभागृह नेते निलेश निकम (Nilesh Nolan) यांनी विरोध केला आहे. या मिळकतींना निवासी दराने प्रचलित धोरणा नुसार वार्षिक करपात्र रकमेची आकारणी करावी. अशी मागणी निकम यांनी महापालिका आयुक्ताकडे केली आहे. (Pune Municipal Corporation)

निकम यांच्या निवेदनानुसार पुणे हे शिक्षणाची पंढरी आहे व तसे दाखले पुणे शहरात असण्याच्या जुन्या व नव्या शैक्षणिक संस्था याची साक्ष देतात. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून पुण्यात शिक्षण घेण्यासाठी इतर शहरातून, राज्यातून हजारो विद्यार्थी येत आहेत. नंतरच्या काळात परदेशी विद्यार्थी सुधा ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पुणे शहरात येत आहेत. आजमितीला पुणे शहरात जवळपास पुणे शहराबाहेरील ३ ते ४ लाख विद्यार्थी शिक्षणानिमित्त / स्पर्धा परीक्षानिमित्त/ स्कील एज्युकेशन घेण्यानिमित्त पुणे शहरात व्यास्तव्य करीत आहेत. त्यांच्या वास्तव्यामुळे पुणे शहरात वर्षाकाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत आहे. सदरील उलाढाल अंदाजे ५००० ते ६००० कोटी प्रतिवर्षी याप्रमाणे होत आहे. असा अंदाज आहे. सदरच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षकांना, राहण्यासाठी शैक्षणिक संस्थांकडे अपुरे वसतिगृह आहेत. (PMC Property tax Department)

निकम यांनी म्हटले आहे कि पुणेकरांनी अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून अशा शैक्षणिक कामानिमित्त पुण्यात वास्तव्य करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या घरी निवासी व्यवस्था करून त्यांची राहण्याची सोय करून दिली आहे. त्या बदल्यात इतर भाडेकरूंकडून ज्या पद्धतीने घर भाड्याची आकारणी केली जाते त्याच पद्धतीने त्यांच्या कडून आकारणी केली जात आहे. सदर जागेचा वापर हा राहण्यसाठी निवासी पद्धतीने होत आहे. (PMC Pune News)
पुणे शहरातील निवासी मिळकतींना मालक स्वतः राहत असल्यास करपात्र रकमेत ४०% सवलत देण्यात येत आहे. व निवासी मिळकत निवासासाठी भाड्याने दिल्यास मिळकत करपात्र रक्कम हि पूर्ण आकारली जाऊन त्यावर मनपाने ठरवून दिलेला मिळकत कर, पाणीपट्टीसहीत आकारला जातो. यापूर्वी माहिती व तंत्रज्ञान (IT & ITES) मिळकतींना निवासी दराने कर आकारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रोजगार निर्माण व आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
शैक्षणिक संस्था, हॉस्टेल यामध्ये राहण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थामुळे या शहरात होत असलेली उलाढाल ही शहरात रोजगार निर्माण करणारी आहे. अनेक घरगुती व्यवसाय जसे खानावळ, छोटी छोटी हॉटेल्स, शैक्षणिक वस्तू पुरविणारे व्यवसाय, व दैनंदिन जीवनात विद्यार्थ्यांना लागणाऱ्या वस्तू यामुळे पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला आहे. विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षक ही लोक पुणे शहरातील अनेक मिळकतींमध्ये पेईंग गेस्ट व भाडेकराराने राहत आहेत. अशा मिळकतींना पुणे म.न.पा. ने व्यावसायिक दराने ( बिगरघरगुती) वार्षिककरपात्र रक्कम आकारल्यास तब्बल अडीच पट ते तिप्पट दराने वार्षिक करपात्र रकमेत वाढ होणार आहे. पर्यायाने जागामालकास सदर विद्यार्थ्यांना राहण्यासाठी देण्यात येणाऱ्या जागेच्या भाड्यात वाढ करावी लागणार आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसून त्याचा आर्थिक भर सोसावा लागणार आहे. निवासी मिळकतींमध्ये विद्यार्थी महिन्याचे भाडे ठरवून राहतात किंवा पेईंग गेस्ट म्हणून महिन्याचे भाडे ठरवून राहतात. त्यांचा वापर हा निवासी आहे. हॉस्टेल मध्ये राहणारे विद्यार्थी सुद्धा निवासासाठी त्याचा वापर करतात, त्यामुळे निवासासाठी वापरणाऱ्या मिळकतींना चालू धोरणानुसार कर आकारणी करावी. ज्यामध्ये हॉस्टेल मध्ये असणारी मेस, कॅन्टीन, दुकान, लॉन्ड्री आहेत त्या वापरापुरता व्यापारी दर लावणे योग्य ठरेल.
आमची मागणी आहे की, हॉस्टेल, पेईंग गेस्ट याचा वापर करण्याच्या व मासिक भाडे आकारणाऱ्या मिळकतींना निवासी दराने प्रचलित धोरणा नुसार वार्षिक करपात्र रकमेची आकारणी करावी. तरी, प्रशासनाने मा. स्थायी समिती पुणे मनपा च्या मान्येतेसाठी ठेवण्यात आलेला पुणे शहरातील
हॉस्टेल, पेईंगगेस्ट, गेस्ट हाउस, सर्विस अपार्टमेंट कर आकारणी बाबत चा विषय हा विद्यार्थी हित लक्षात घेऊन मागे घेण्यात यावा. असे निकम यांनी म्हटले आहे.
—-