PMC Chief Auditor | पुणे महापालिकेच्या नवनियुक्त मुख्य लेखापरीक्षक यांच्यापुढे कार्यालयीन शिस्तीची आणि कामकाजाची ढीगभर आव्हाने!

HomeपुणेBreaking News

PMC Chief Auditor | पुणे महापालिकेच्या नवनियुक्त मुख्य लेखापरीक्षक यांच्यापुढे कार्यालयीन शिस्तीची आणि कामकाजाची ढीगभर आव्हाने!

गणेश मुळे Jul 10, 2024 8:18 AM

Ease of Living 2022 | पुणे शहरास राहण्यास सर्वोत्तम शहर म्हणून पुनःश्च प्रथम क्रमांक प्राप्त होण्यासाठी महापालिका प्रयत्नशील | मनपा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा सहभाग अपेक्षित
PMC Water Supply Department | पाणीपुरवठ्याच्या तक्रारी बाबत आता अभियंत्यावर जबाबदारी निश्चित केली जाणार  | पाणीपुरवठा विभागाचा निर्णय 
Best MP Supriya Sule | देशातील सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर खासदार सुप्रिया सुळे यांची पुन्हा एकदा मोहोर

PMC Chief Auditor | पुणे महापालिकेच्या नवनियुक्त मुख्य लेखापरीक्षक यांच्यापुढे कार्यालयीन शिस्तीची आणि कामकाजाची ढीगभर आव्हाने!

PMC Chief Auditor – (The Karbhari News Service) – महापालिकेचे मुख्य लेखा परीक्षक तथा सह महापालिका आयुक्त अंबरीष गालिंदे (Ambrish Galinde PMC) हे सेवानिवृत्त झाले आहेत. हे पद रिक्त झाल्याने या पदाचा अतिरिक्त पदभार हा पुणे महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी (PMC Chief Finance Officer) जितेंद्र कोळंबे (Jitendra Kolambe PMC) यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. कोळंबे यांनी जोमाने कामाला सुरवात केली आहे. मात्र कार्यालयीन कामकाजात बऱ्याच त्रुटी दिसून येत आहेत. त्या रोखणे हे त्यांच्यापुढे आव्हान आहे. हे आव्हान कोळंबे कसे पेलणार, याबाबत आता उत्सुकता लागून राहिली आहे. (Pune Municipal Corporation (PMC)

| ही असतील आव्हाने!

मुख्य लेखापरीक्षक कार्यालयात काम करणाऱ्या वरिष्ठ ग्रेड लेखनिक यांची नेमणूक दुसऱ्या खात्यात आहे. मात्र ते मुख्य लेखापरीक्षक कार्यालयात काम पाहतात. याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे कुठलेही लेखी आदेश नाहीत. 2019 पासून संबंधित सेवक खात्यात कामाला आहे. नुकतीच त्यांची बदली करण्यात आली. आता तरी त्यांना त्यांच्या बदलीच्या ठिकाणी पाठवले जाणार का?
मुख्य लेखापरीक्षक खात्यात बिगारी या हुद्द्याची कुठलीही जागा नाही. तरीही गेल्या 10 वर्षांपासून खात्यात बिगारी पदावर काम करणारे सेवक आहे. त्यांना त्याच्या मूळ खात्यात कधी पाठवले जाणार?
सेवाप्रवेश नियमावली नुसार खात्यातील लोकांना पदोन्नती आणि बदलीने बढती देण्यात आलेली नाही. हे काम बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित आहे. याकडे लक्ष दिले जाणार का?
सद्यस्थितीत सब ऑडिटर या पदासाठी पदोन्नती दिली जाणार आहे. याबाबतचे विषयपत्र निवड समिती ठेवण्यात आले आहे. यामधील काही कर्मचाऱ्यांना मुख्य लेख परीक्षक कार्यालयात कामाला 3 वर्ष पूर्ण झालेली नाहीत. तरीही त्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची शिफारस करण्यात आली आहे. संबंधित विषयपत्रातील त्रुटी बाबत लक्ष दिले जाणार का?
याबाबत कर्मचाऱ्यानी तत्कालीन मुख्य लेखा परीक्षक यांच्याकडून घाईने सही करून घेतली आहे. तसेच पदोन्नती विषयपत्रात सेवाज्येष्ठता देखील चुकीच्या पद्धतीने घालण्यात आली आहे.
त्यामुळे नुकत्याच खात्यात आलेल्या मुख्य लेखा परीक्षक यांना या सगळ्यांचा अभ्यास करून नियम आणि कायद्याचा आधार घेत काम करावे लागणार आहे.