PMC Celebrates 77th Republic Day | पुणे महानगरपालिकेत भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 

Homeadministrative

PMC Celebrates 77th Republic Day | पुणे महानगरपालिकेत भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 

Ganesh Kumar Mule Jan 26, 2026 3:17 PM

Sanitation | PMC | नालेसफाई संदर्भात मनपा प्रशासनाला इशारा !
Anandacha Shidha | Diwali | सिंहगड रोड भागातील एकाही स्वस्त धान्य  दुकानांमध्ये दिवाळी किट उपलब्ध नाही  | धान्य उपलब्ध करून देण्याची महेश पोकळे यांची मागणी 
Pune Road Potholes | दिवाळीच्या दिवसात पुणेकरांना खड्ड्यात घालू नका | रस्ते खोदाईची कामे थांबवण्याची मागणी

PMC Celebrates 77th Republic Day | पुणे महानगरपालिकेत भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

 

Republic Day 2026 – (The Karbhari News Service)  – पुणे महानगरपालिकेचे वतीने भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन संपन्न करण्यात आला.

प्रशासक तथा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्टीत पुतळ्यास पुष्प अर्पण केले. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण केले. त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. (Pune Municpal Corporation – PMC)

तसेच सकाळी ८.०५ वाजता मा. प्रशासक तथा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचे शुभहस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले व संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामुहिक वाचन करण्यात आले.

याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) पृथ्वीराज बी. पी. ,  अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) पवनीत कौर , अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे तसेच विविध विभागांचे उपआयुक्त व खातेप्रमुख तसेच इतर अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: