PMC Building Devlopment Department | कोथरूड परिसरात पुणे महापालिकेकडून हॉटेल्स वर कारवाई | १०३४९ चौ.फूट अनधिकृत बांधकाम हटवले 

HomeपुणेBreaking News

PMC Building Devlopment Department | कोथरूड परिसरात पुणे महापालिकेकडून हॉटेल्स वर कारवाई | १०३४९ चौ.फूट अनधिकृत बांधकाम हटवले 

गणेश मुळे May 27, 2024 4:18 PM

Unauthorized Stalls Selling Ganpati Idols | पुणे शहरात गणपती मुर्ती विक्रीचे 222 अनधिकृत स्टॉल | १९५ लोकांना दिली नोटीस
NCP | Agitation | झाडे वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचे झाडावर चढून आंदोलन!
Mukhyamantri Majhi Ladki Bahin | मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत जर कोणी भ्रष्टाचार करत असेल तर त्याला शिवसेना स्टाईल उत्तर दिले जाईल |  डॉ. नीलम गोऱ्हे

PMC Building Devlopment Department | कोथरूड परिसरात पुणे महापालिकेकडून हॉटेल्स वर कारवाई | १०३४९ चौ.फूट अनधिकृत बांधकाम हटवले

 

PMC Building Devlopment Department – (The Karbhari News Service) – कोथरूड परिसरात रूफ टॉप हॉटेल ,पत्राशेड व अनधिकृत बांधकाम यावर पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन ६ यांचेमार्फत पोलीस स्टाफच्या मदतीने धडक कारवाई करण्यात आली. (Pune Municipal Corporation (PMC)

या कारवाई मधे सुमारे १०३४९ चौ.फूट क्षेत्र निष्कासित करण्यात आले आहे.  हॉटेल नक्षत्र रेस्टो बार, स्पाइस गार्डन,कोरियडेर लिफ रेस्टोरंट,हॉटेल टेस्टी बेस्टी, या हॉटेल्स वर ही कारवाई करण्यात आली. (Pune PMC News)

ही कारवाई पुणे महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता – राजेश बनकर, बांधकाम विभाग झोन क्र.६ चे कार्यकारी अभियंता  बिपीन शिंदे  यांचे मार्गदर्शनाखाली उप अभियंता  श्रीकांत गायकवाड, कनिष्ठ अभियंता  मनोजकुमार मते, सागर शिंदे,राहुल रसाळे, समीर गडाई व सहाय्यक गणेश ठोंबरे, राठोड, हृषीकेश जगदाळे,भावेश इत्यादी स्टाफ, सहा पोलिस यांच्या पथकाने एक जेसीबी, दोन गॅस कटर, एक ब्रेकर दहा अतिक्रमण कर्मचारी यांचे सहाय्याने कारवाई केली.