PMC Budget 2024-25 | पुणे महापालिका आयुक्त 7 मार्च ला सादर करणार अंदाजपत्रक!  

HomeBreaking Newsपुणे

PMC Budget 2024-25 | पुणे महापालिका आयुक्त 7 मार्च ला सादर करणार अंदाजपत्रक!  

गणेश मुळे Feb 28, 2024 12:29 PM

PMC Budget | प्रशासक विक्रम कुमारांनी सादर केलेल्या बजेटबाबत शिवसेना आणि काँग्रेस शहर अध्यक्षांना काय वाटते?
PMC Budget | महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या बजेटबाबत राष्ट्रवादी आणि भाजपला काय वाटते?
PMC Budget : Commissioner Vikram Kumar : अपरिहार्य कारणास्तव आयुक्त पालिकेचे बजेट 22 फेब्रुवारीला सादर करणार नाहीत 

PMC Budget 2024-25 | पुणे महापालिका आयुक्त 7 मार्च ला सादर करणार अंदाजपत्रक!

– स्थायी समिती समोर प्रस्ताव

पुणे : (The Karbhari Online) –  पुणे महापालिकेचे वर्ष 2024-25 चे अंदाजपत्रक (PMC Budget 2024-25) महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar IAS) 7 मार्च ला सकाळी 11:30 वाजता सादर करणार आहेत. मुख्य सभा ठरावानुसार आयुक्तांनी 15 जानेवारी पर्यंत अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करणे आवश्यक असते. मात्र महापालिका आयुक्तांना अपरिहार्य कारणास्तव उचित कालावधीत बजेट सादर करणे शक्य झाले नाही.  आता 7 मार्च ला बजेट सादर करण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समितीच्या समोर ठेवला आहे. (Pune Municipal Corporation Budget)
| 15 जानेवारी पर्यंत अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करणे आवश्यक
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ९५ नुसार महानगरपालिकेचे महसूली, भांडवली इ. उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक आराखडा (“अ” व “क’) अंदाजपत्रक १५ जानेवारी अगर तत्पूर्वी स्थायी समितीस सादर करणे
आवश्यक आहे. त्यांनतर स्थायी समिती अध्यक्ष त्यात बदल करून बजेट मुख्य सभेला सादर करतात. मुख्य सभेत चर्चा होऊन हे बजेट 31 मार्च पूर्वी मंजूर होणे आवश्यक असते. त्यांनतर त्यावर अंमल करता येतो. दरम्यान महापालिका आयुक्तांनी बजेट सादर करण्याची तयारी सुरु केली होती. सर्व विभागाकडून आयुक्तांनी याबाबतची माहिती मागवली होती. मात्र महापालिका आयुक्तांना अपरिहार्य कारणास्तव उचित कालावधीत बजेट सादर करणे शक्य झाले नाही.  आता 7 मार्च ला बजेट सादर करण्याबाबत प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समिती मार्फत मुख्य सभेसमोर ठेवण्यात आला आहे.
समाविष्ट गावांच्या विकासावर द्यावे लागणार लक्ष 
दरम्यान महापालिका आयुक्त यांच्याकडून अंदाजपत्रकाच्या माध्यमातून समाविष्ट गावांच्या खूप अपेक्षा आहेत. कारण गावे समाविष्ट होऊन वर्षे सरत आली तरी गावांचा रचनाबद्ध विकास झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना मूलभूत समस्यांशी झगडावे लागते. इतके असूनही नागरिकांची करातून सुटका नाही. त्यामुळे नागरिकांना बजेट मधून खूप अपेक्षा आहेत. प्रशासनाने शहरातील रस्त्यांवर चांगले लक्ष देऊन रस्ते मोठे केले आहेत. आता नवीन बजेट मध्ये नवीन काही रस्ते सुचवले जाणार का, याकडे लक्ष असणार आहे. तसेच पुणेकरांसाठी बजेट च्या माध्यमातून आयुक्त नवीन काय घेऊन येणार आहेत, याकडे देखील लक्ष असणार आहे.