PMC Biometric Attendence | मनपा भवन मध्ये १ डिसेंबर पासून तर परिमंडळ, क्षेत्रीय कार्यालयात १ जानेवारी पासून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक | अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांचे आदेश 

Homeadministrative

PMC Biometric Attendence | मनपा भवन मध्ये १ डिसेंबर पासून तर परिमंडळ, क्षेत्रीय कार्यालयात १ जानेवारी पासून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक | अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांचे आदेश 

Ganesh Kumar Mule Nov 28, 2025 8:48 PM

PMC Recruitment Exam Results | अखेर पुणे महापालिकेकडून घेण्यात आलेल्या लिपिक टंकलेखक या पदासाठी झालेल्या परीक्षेचा निकाल  जाहीर | २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर  ला कागदपत्रांची छाननी
PMC Swachha Bharat Divas | महापालिका घनकचरा विभागाच्या वतीने स्वच्छ भारत दिवस साजरा!
Voter Awareness | निवडणूक कर्मचाऱ्यांकडून घरोघरी जाऊन मतदार जागृती

PMC Biometric Attendence | मनपा भवन मध्ये १ डिसेंबर पासून तर परिमंडळ, क्षेत्रीय कार्यालयात १ जानेवारी पासून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक | अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांचे आदेश

| हजेरी अभावी वेतन रखडल्यास होणार कडक कारवाई

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – “Aadhaar Based Facial Biometric Attendance” ची प्रणाली पुणे महानगरपालिकेमध्ये कार्यान्वित करण्याबाबत अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार १ डिसेंबर पासून बायोमेट्रिक हजेरी महापालिका कर्मचारी आणि अधिकारी यांना बंधनकारक करण्यात आली आहे. हजेरी अभावी वेतनात अडचणी निर्माण झाल्यास खातेप्रमुख आणि संबंधित कर्मचारी यावर कडक कारवाई करण्याचा इशारा अतिरिक्त आयुक्त यांनी दिला आहे. (PMC Employees and Officers Attendence)

पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना दैनंदिन बायोमेट्रिक हजेरीसाठी संपर्क क्रमांक व इतर तपशील देऊन “Aadhaar Based Facial Biometric Attendance” साठीचे रजिस्ट्रेशन पूर्ण करणे बाबत या आधी  सूचित करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतन प्रणालीस बायोमेट्रिक हजेरी प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे लगतच्या कालावधीत टप्या-टप्याने १००% रजिस्ट्रेशन पूर्ण करणे आवश्यक आहे.

त्यानुषंगाने पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी पुढील ५ दिवसांचे मुदतीत  संबंधित प्रतिनिधी यांचेशी वैयक्तिक खाते स्तरावरून संपर्क साधून रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करण्याची कार्यवाही त्वरेने करून घ्यावी. बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक असल्याने अधिकारी व कर्मचारी यांचे पुढील महिन्याचे मासिक वेतन अदा करण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.

पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी “Aadhaar Based Facial Biometric Attendance” रजिस्ट्रेशन पूर्ण करून १ डिसेंबर  पासून  मुख्य इमारतीमध्ये तसेच १ जानेवारी  पासून सर्व परिमंडळ कार्यालये,  क्षेत्रीय कार्यालये व इतर सर्व खात्यांमध्ये बायोमेट्रिक पद्धतीनेच दैनंदिन हजेरीची नोंद करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त यांनी दिले आहेत. अतिरिक्त आयुक्त यांनी पुढे म्हटले आहे कि या  आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, यामध्ये दिरंगाई झाल्याचे निदर्शनास आल्यास तसेच बायोमेट्रिक हजेरी अभावी वेतन अदा करण्यामध्ये अडचणी उद्भवल्यास संबंधित खातेप्रमुखास व सेवकास व्यक्तीशः जबाबदार धरून त्यांचेविरुद्ध आवश्यक ती पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल.
———

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: