PMC Biometric Attendance | बायोमेट्रिक हजेरीसाठी महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नोंदणी करण्याचे अतिरिक्त आयुक्त यांचे आदेश 

Homeadministrative

PMC Biometric Attendance | बायोमेट्रिक हजेरीसाठी महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नोंदणी करण्याचे अतिरिक्त आयुक्त यांचे आदेश 

Ganesh Kumar Mule Nov 15, 2025 5:35 PM

Manohar Bhide | मनोहर भिडेंना अटक करा | महिलांचा अपमान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक
पुणे महापालिका रणसंग्राम | PMC Election 2022 | महिला आरक्षण | काहींची गणिते जुळली तर काहींना करावे लागणार पक्षांतर! 
Media Tower | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मीडिया टॉवर गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन

PMC Biometric Attendance | बायोमेट्रिक हजेरीसाठी महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नोंदणी करण्याचे अतिरिक्त आयुक्त यांचे आदेश

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये Aadhaar Based Facial Biometric Attendance Machine बसवण्यात येणार आहेत. त्यानुसार बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक असणार आहे. त्यासाठी आधी नोंदणी आवश्यक आहे. ही नोंदणी सर्व कमर्चारी आणि अधिकाऱ्यांनी करून घेण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांनी दिले आहेत. (Prithviraj B P IAS)

पुणे महानगरपालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये Aadhaar Based Facial Biometric Attendance Machine पुरविणे, बसविणे व चालू करून देणे या कामासाठी विद्युत विभागामार्फत निविदा  प्रक्रिया राबविण्यात आली आहे.    Fitech Solutions LLP  मार्फत Biometric Attendance Machine बनविण्याचे काम करण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांची दैनंदिन हजेरी या यंत्रणेद्वारे नोंदविण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांचे नोंदणी (Registration) करणे आवश्यक आहे. तरी सर्व खातेप्रमुख, उप आयुक्त तसेच महापालिका सहायक आयुक्त यांनी आपल्या अधिनस्त सर्व कर्मचाऱ्यांना पुढील १ महिन्यात Biometric Attendance Machine वर नोंदणी (Registration) करून घेण्यास सूचित करावे. असे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले आहेत.

नोंदणी (Registration) करणेसाठी खालील ठिकाणे निश्चित करण्यात आलेली आहेत.

१) मनपा मुख्य इमारत, तळमजला, स्वागत कक्ष
२) मनपा नवीन इमारत विस्तारित कक्ष, तळमजला, एक खिडकी योजना
३) परिमंडळ क्र. १ ते ५ कार्यालये
४) सर्व १५ क्षेत्रिय कार्यालये

कर्मचाऱ्यांनी नोंदणी (Registration) करणेकरिता खालील कागदपत्रे सोबत घेऊन येणे आवश्यक आहे.

१) आधार कार्ड
२) मनपा ओळखपत्र (Employee ID Card)
३) नोंदणीकृत आधार लिंक मोबाईल क्र.
४) पगार पावती (salary slip)
५) शिफ्ट टायमिंग (पर्यायी)

तसेच नोंदणी प्रक्रियेकरिता Fitech Solutions LLP चे प्रतिनिधी श्री. आदित्य उभे (मो. क्र. ८४५९४९७९६५) यांच्याशी संपर्क साधावा,

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0