PMC Additional Commissioner | अतिरिक्त महापालिका आयुक्त यांच्याकडील कामकाज व्यवस्थेत बदल!

Homeadministrative

PMC Additional Commissioner | अतिरिक्त महापालिका आयुक्त यांच्याकडील कामकाज व्यवस्थेत बदल!

Ganesh Kumar Mule May 27, 2025 6:02 PM

Shivsena UBT Pune |  शहर विद्रूपीकरण करूनही भाजप वर कारवाई का नाही ? शिवसेना (UBT) गटाचा महापालिका आयुक्तांना सवाल 
Dr Rajendra Bhosale IAS | पुणे महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी पाच मानाच्या गणपतींचे दर्शन घेऊन केली पूजा!
PMC Deputy Commissioner | पुणे महापालिकेच्या 7 उपायुक्तांना रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत ड्युटी | 11 जुलै पर्यंत करावे लागणार काम 

PMC Additional Commissioner | अतिरिक्त महापालिका आयुक्त यांच्याकडील कामकाज व्यवस्थेत बदल!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – अतिरिक्त महापालिका आयुक्त यांच्या कामकाज व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त (ज) एम जे प्रदीप चंद्रेन (M J Pradip Chandren IAS) हे ६ जून पर्यंत प्रशिक्षणासाठी गेले आहेत. त्यानुसार त्यांच्याकडे असणारा कार्यभार दोन अतिरिक्त आयुक्त (विशेष आणि इस्टेट) यांच्याकडे विभागून देण्यात आला होता. मात्र यात आता बदल करण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्त (ज) यांच्याकडील सर्व कार्यभार हा अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी (Prithviraj B P IAS) यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे. महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी या बाबत आदेश जारी केले आहेत.

या विभागांचा असणार अतिरिक्त कार्यभार

१)मुख्य लेखा व वित्त विभाग
२)आरोग्य विभाग
३)मागासवर्ग विभाग
४)लेखापरिक्षण विभाग
५)उप आयुक्त (विशेष) विभाग, जनरल रेकॉर्ड विभाग
६)सामान्य प्रशासन विभाग
७)बांधकाम विभागाचे कामकाजातील महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमा खालील ५३,५५,५६ खालील नियंत्रण मात्रमंजुर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली व नागरी विमान वाहतुक मंत्रालय (विमान प्रचालन सुरक्षेसाठी इमारत उंची निर्बंध) नियम २०१५ खालील प्रकरणे वगळून.
८)परिमंडळ विभाग क्र. १ ते ३ चे प्रशासन
९)झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग
१०) अग्निशमनदल व आपत्ती व्यस्थापन विभाग
११) अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मुलन

१२) पाणीपुरवठा
१३) पाणीपुरवठा प्रकल्प
१४) तांत्रिक विभाग
१५) प्राथमिक शिक्षण विभाग
१६) शिक्षणाधिकारी (माध्यमिक व तांत्रिक) विभाग
१७) माहिती व तंत्रज्ञान विभाग
१८) कामगार कल्याण विभाग
१९) मंडई विभाग
२०) माहिती व जनसंपर्क विभाग
२१) चाळ विभाग