PMC Additional Commissioner | घनकचरा व्यवस्थापन, सामान्य प्रशासन विभाग अतिरिक्त आयुक्त (इस्टेट) यांच्या नियंत्रणात तर बांधकाम विभाग अतिरिक्त आयुक्त (जनरल) यांच्या नियंत्रणात तर मिळकत कर विभाग अतिरिक्त आयुक्त विशेष यांच्याकडे | विशेष यांच्या नियंत्रणात २३ खाती 

Homeadministrative

 PMC Additional Commissioner | घनकचरा व्यवस्थापन, सामान्य प्रशासन विभाग अतिरिक्त आयुक्त (इस्टेट) यांच्या नियंत्रणात तर बांधकाम विभाग अतिरिक्त आयुक्त (जनरल) यांच्या नियंत्रणात तर मिळकत कर विभाग अतिरिक्त आयुक्त विशेष यांच्याकडे | विशेष यांच्या नियंत्रणात २३ खाती 

Ganesh Kumar Mule Apr 03, 2026 7:19 PM

Clashes | अजित पवारांच्या रोड शो वेळी महाविकास आघाडी- शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले
Information and Public Relations Department | माहिती व जनसंपर्क विभागाच्या उपायुक्तांचा पदभार अचानक बदलला  | अतिरिक्त महापालिका आयुक्त यांचे आदेश 
PMC Election 2022 | Women Reservation | महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागातील महिला आरक्षणाची सोडत उद्या | महापालिका प्रशासनाकडून रंगीत तालीम; जय्यत तयारी 

 PMC Additional Commissioner | घनकचरा व्यवस्थापन, सामान्य प्रशासन विभाग अतिरिक्त आयुक्त (इस्टेट) यांच्या नियंत्रणात तर बांधकाम विभाग अतिरिक्त आयुक्त (जनरल) यांच्या नियंत्रणात तर मिळकत कर विभाग अतिरिक्त आयुक्त विशेष यांच्याकडे | विशेष यांच्या नियंत्रणात २३ खाती

| अतिरिक्त आयुक्त यांच्या कामकाजात बदल

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल), अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) व अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) यांचे नियंत्रणाखाली सोपवावयाचे विभागांबाबत यापूर्वी आदेश पारित करण्यात आले होते. त्यामध्ये अंशतः बदल करण्यात आला आहे. पूर्वी घनकचरा व्यवस्थापन विभाग हा इस्टेट यांच्या नियंत्रणात होता. तो जनरल यांच्या अखत्यारीत देण्यात आला होता. पुन्हा यात बदल करत तो इस्टेट यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तर सामान्य प्रशासन विभाग हा पूर्वीपासून जनरल यांच्या अखत्यारीत होता, तो आता इस्टेट यांच्या नियंत्रणात देण्यात आला आहे. तर बांधकाम विभाग इस्टेट कडून काढून घेत तो जनरल कडे देण्यात आला आहे. तेच कामगार कल्याण  विभाग देखील जनरल यांच्याकडून इस्टेट यांच्याकडे देण्यात आला आहे. तसेच नगरसचिव विभाग जनरल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. तर मिळकत कर विभाग हा पहिल्यांदाच विशेष यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांचे नियंत्रणाखालील विभाग / खाती

 

१) मुख्य लेखा व वित्त विभाग

२) लेखा परीक्षण विभाग

३) बांधकाम विभाग (संपूर्ण नस्तीसह)

४) पाणीपुरवठा विभाग व पाणीपुरवठा प्रकल्प

५) मलनि:सारण प्रकल्प

६) मलनिःसारण देखभाल दुरुस्ती विभाग

७) आरोग्य विभाग

८) प्राथमिक शिक्षण विभाग

९) शिक्षणाधिकारी (माध्यमिक व तांत्रिक) विभाग

१०) विधी विभाग

११) उपायुक्त विशेष विभाग

१२) सुरक्षा विभाग

१३) अतिक्रमण  / अनाधिकृत  बांधकाम निर्मुलन विभाग

१४) जिल्हा नियोजन व विकास समिती

१५) मुद्रणालय विभाग

१६) नगरसचिव विभाग

१७) परिमंडळ १ व २

अतिरिक्त आयुक्त  (इ) यांचे नियंत्रणाखालील विभाग/ खाती

१) सामान्य प्रशासन विभाग

२) घनकचरा व्यवस्थापन

३) भवन रचना विभाग

४) झोपडपट्टी निर्मुलन व पुर्नविकास, चाळ विभाग

५) अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन विभाग

६) विद्युत विभाग

७) नदी सुधारणा प्रकल्प

८) कामगार कल्याण विभाग

९) मंडई विभाग

१०) जनरल रेकॉर्ड विभाग

११ ) तांत्रिक विभाग

१२) प्रशिक्षण प्रबोधिनी विभाग

१३) मागासवर्ग कक्ष

१४) मोटार वाहन विभाग

१५) आकाशचिन्ह व परवाना विभाग

१६) टेंडर सेल

१७)  पर्यावरण विभाग

१८) परिमंडळ विभाग क्र. ४ व ५

 

अतिरिक्त आयुक्त  (वि) यांचे नियंत्रणाखालील विभाग/ खाती

 

१) पथ विभाग

२) मालमत्ता व व्यवस्थापन विभाग

३) भूसंपादन व व्यवस्थापन विभाग

४) प्रकल्प विभाग

५) कर आकारणी व संकलन विभाग

६) मध्यवर्ती भांडार विभाग

७) उद्यान विभाग

८) क्रीडा विभाग

९) माहिती व तंत्रज्ञान विभाग

१०) प्रधानमंत्री आवास योजना

११) एसआरए

१२) माहिती व जनसंपर्क विभाग

१३) स्थानिक संस्था कर विभाग

१४) जनगणना विभाग

१५) ऑप्टिकल फायबर इन्फ्रास्ट्रक्चर विभाग

१६) बी.एस.यु.पी. सेल

१७) बी.ओ.टी. सेल विभाग

१८) सायकल विभाग

१९)  सांस्कृतिक विभाग

२०) समाज कल्याण विभाग

२१) समाज विकास विभाग

२२)  निवडणूक विभाग

२३) परिमंडळ क्र. ३

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: