बाणेर-बालेवाडी भागाप्रमाणे सुस-महाळुंगे चा नियोजनबद्ध विकास करणार
: नगरसेवक बाबुराव चांदेरे यांचे आश्वासन
पुणे : पीएमआरडीए’वर स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक बाबुराव चांदेरे यांची सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ रहिवाशी संघ आणि सूस ग्रामस्थ यांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. या सत्काराबद्दल बाबुराव चांदेरे यांनी सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले. या आपुलकीच्या सत्कारामुळे अधिकाधिक काम करण्यासाठी मला नेहमीच प्रेरणा मिळत राहील. अशी ग्वाही देखील माजी स्थायी समिती अध्यक्ष तथा नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी दिली. यावेळी चांदेरे म्हणाले, सूस-म्हाळुंगे या गावांचा समावेश जरी महापालिकेत झाला असला तरी बाणेर-बालेवाडी भागाप्रमाणे या भागाचाही नियोजनबद्धपणे विकास करण्यात येईल.
चांदेरे पुढे म्हणाले, वास्तविक गेल्या १५-२० वर्षांपासून या भागातील नागरिकांचे आणि माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. याच जिव्हाळ्यातून आणि या मंडळींच्या विश्वासातून त्यांची सेवा करण्याची संधी मला मिळतेय हे एक प्रकारे माझे भाग्यच आहे. आजवर तुम्ही ठेवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही हा माझा शब्द आहे. आपलं हक्काचं घर असावं म्हणून या भागात अनेकजणांनी आपापल्या कुवतीप्रमाणे थोड्या-थोड्या जागा घेऊन घर बांधले आहे. ते भलेही आज अनधिकृत असले तरी यामध्ये या नागरीकांची काहीही चूक नाही. त्यामुळे तुमच्या बांधकामाची एकही वीट हलनार नाही, यासाठी माझा सदैव प्रयत्न राहील. काही नागरिकांच्या राहत्या घरावर रस्त्याचे आरक्षण पडले आहे. घर जाऊन तेथील रहिवाशी रस्त्यावर येणार असतील तर मी तेही होऊ देणार नाही. या घरांवर पडलेले आरक्षण पर्यायी जागेवर हलविण्याचा माझा प्रयत्न आहे. सूस-म्हाळुंगे या गावांचा समावेश जरी महापालिकेत झाला असला तरी बाणेर-बालेवाडी भागाप्रमाणे या भागाचाही नियोजनबद्धपणे विकास करण्यात येईल. त्यासाठी या भागातील नागरिक हे माझ्यासोबत आहेत याचा मला नेहमीच अभिमान वाटतो असे मत चांदेरे यांनी व्यक्त केले.
चांदेरे म्हणाले, पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांना महापालिकाने जो निधी मंजूर केला आहे त्या मधूनच सूस-म्हाळुंगे गावांना पिण्याच्या पाण्याच्या करिता निधी उपलब्ध करून या गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्याचा माझा प्रयत्न आहे. या भागाच्या पाणीपुरवठ्यासाठी सिंटेक्स टाक्या बांधण्यासाठी ४० लाख रुपये मंजूर करुन आणले आणि या कामाचा शुभारंभ केला. तसेच टँकरने तातडीचा पाणीपुरवठा करण्यासाठीही ४० लाख रुपये निधी मंजूर करुन आणला असून हे काम सुरु झाले आहे. येथील नागरिकांच्या सहकार्यामुळेच हे काम करता आले. भविष्यातही या भागात अधिकाधिक नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कार्यरत राहण्याचा शब्द बाबुराव चांदेरे यांनी यावेळी दिला. यावेळी स्थानिक नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी सूस मधील ‘हनुमान विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित या विकास सोसायटी’मधील बिनविरोध निवडून आलेल्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा तसेच बिनविरोध निवडीसाठी मदत करणाऱ्या सर्व सभासद बांधवांचा सत्कार बाबुराव चांदेरे यांच्या हस्ते करण्यात आला.
COMMENTS