PEHEL 2024 Pune PMC | पेहेल-२०२४ |  4 तासात 53 टन ई-कचरा आणि प्लॅस्टिक जमा

HomeBreaking Newsपुणे

PEHEL 2024 Pune PMC | पेहेल-२०२४ |  4 तासात 53 टन ई-कचरा आणि प्लॅस्टिक जमा

गणेश मुळे Feb 25, 2024 1:10 PM

Prithviraj B P IAS | सगळ्यांना बरोबर घेऊन काम करणार | पृथ्वीराज बी पी यांनी स्वीकारला अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई) पदाचा पदभार
PEHEL 2024 Pune PMC | 53 tonnes of e-waste and plastic Waste accumulated in 4 hours
PMC Toilet Seva App | टॉयलेटसेवा अॅपचा वापर करणे घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बंधनकारक   | अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार यांची पत्रकार परिषदेत माहिती 

PEHEL 2024 Pune PMC | पेहेल-२०२४ |  4 तासात 53 टन ई-कचरा आणि प्लॅस्टिक जमा

 

PEHEL 2024 Pune PMC | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation (PMC) आणि शहरातील सामाजिक संस्थांच्या वतीने ‘पेहेल-२०२४’ हे (PEHEL 2024) शहर स्तरावरील ई-कचरा (E – Waste) आणि प्लॅस्टिक संकलन अभियान रविवार रोजी राबविले गेले. यात पुणेकरांनी 415 संकलन केंद्रावर 4 तासात 53 टन ई-कचरा आणि प्लॅस्टिक जमा केले. अशी माहिती महापालिका घनकचरा विभागाच्या (PMC Solid Waste Management Department) वतीने देण्यात आली. (Pune PMC News)

संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिका, कमिन्स इंडिया फाऊंडेशन, केपीआयटी, पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशन आणि पुण्यातील सामाजिक संस्था यांच्याद्वारे पर्यावरण सप्ताहात ‘पेहेल-२०२४’ हे शहर स्तरावरील ई-कचरा आणि प्लॅस्टिक संकलन अभियान  25 फेब्रुवारी रोजी राबविले गेले. या अभियानाचे उद्घाटन प्रमुख अतिथी  संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी आणि डॉ. कुणाल खेमनार, पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त यांच्या हस्ते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान येथे संपन्न झाले. (Pune Municipal Corporation Latest News)

The karbhari - Pune Plastic e waste

या कार्यक्रमाला घनकचरा व्यवस्थापन प्रमुख उपायुक्त  संदिप कदम कमिन्स इंडिया फाऊंडेशनच्या CSR प्रमुख  सौजन्या वेगुरु, केपीआयटीचे CSR प्रमुख  तुषार जुवेकर, आदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटिव्हचे श्री. मल्हार करवंदे, पूर्णम इकोव्हिजन फाऊंडेशनचे संचालक अतुल क्षीरसागर व सीईओ डॉ. राजेश मणेरीकर, माजी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, मनपा सहाय्यक आरोग्यअधिकारी डॉ. केतकी घाटगे हे यावेळी उपस्थित होते.

वेगवेगळ्या संस्थांच्या, कंपनीच्या तसेच महाविद्यालयाच्या सुमारे १२०० स्वयंसेवकांनी १८ ते २४ फेब्रुवारी रोजी, लोकांमध्ये सर्व नागरिकांनी अभियानांतर्गत जनजागृतीचे प्रयोग केले. पथनाट्य, खेळातून जनजागृती, चौकसभा, पत्रक वाटप केले गेले. या अभियानात स्वयंसेवकांकडून उभारण्यात आलेल्या 415 संकलन केंद्रांवर सकाळी ९ ते दुपारी 1 या वेळेत उत्तम प्रतिसाद देत मोठ्या संख्येने ई-कचरा आणि प्लॅस्टिक जमा केले.

The karbhari - PMC solid waste management department

अभियानातून एकूण सुमारे ७५०० जणांनी आपल्या घरातील कचरा केंद्रावर दिला. यावेळी अंदाजे 53 टन कचरा संकलित झाला असून त्यामध्ये 40 टन ई-कचरा आणि 13 टन प्लॅस्टिक कचरा जमा झाला आहे. जमा झालेल्या ई- कचऱ्यातून दुरुस्त होण्यासारखे कॉम्प्युटर आणि लॅपटॉप दुरुस्त करून गरजू शाळा आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत. उर्वरित ई-कचरा आणि प्लॅस्टिक कचऱ्याचे शासनमान्य रिसायकलर्स द्वारे शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाईल. असे घनकचरा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.