Pedestrian Day Pune | पुणे महानगरपालिका आणि पुणे मेट्रोच्या संयुक्त विद्यमाने शहरात पादचारी दिनाचे आयोजन

Homeadministrative

Pedestrian Day Pune | पुणे महानगरपालिका आणि पुणे मेट्रोच्या संयुक्त विद्यमाने शहरात पादचारी दिनाचे आयोजन

Ganesh Kumar Mule Dec 10, 2024 8:24 PM

PMC Pedestrian Day | पुणे महापालिकेकडून सलग तिसऱ्या वर्षी पादचारी दिन साजरा
Pedestrian Day Pune | पुणे महापालिका आयोजित पादचारी दिनाला चांगला प्रतिसाद! | पादचारी समस्यां बाबत अभ्यास करून DPR बनविण्याच्या महापालिका आयुक्त यांच्या सूचना 
Pune Metro in association with Pune Municipal Corporation Celebrate Pedestrian Day – 11th December 2024

Pedestrian Day Pune | पुणे महानगरपालिका आणि पुणे मेट्रोच्या संयुक्त विद्यमाने शहरात पादचारी दिनाचे आयोजन

 

PMC – Pune Metro – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation – PMC) संयुक्त विद्यमाने पुणे मेट्रो (Pune Metro), ११ डिसेंबर रोजी पादचारी दिन (Pedestrian Day) साजरा करत आहे. या उपक्रमाचा उद्देश चालण्यास प्रोत्साहन देणे, खाजगी वाहनांवरील अवलंबित्व कमी करणे आणि सार्वजनिक वाहतुकीच्या वापरास प्रोत्साहन देणे, हा आहे. या दिवशी पोलीस उपायुत्क वाहतूक शाखा, यांनी जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार लिंबराज महाराज चौक (नगरकर तालीम चौक) ते गरूड गणपती चौक या दरम्यानच्या रस्त्यावरून सर्व प्रकारच्या वाहनांना सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत प्रवेशबंदी असेल. यामुळे नागरिकांना विना अडथळा शहरातील या कार्यक्रमाचा आनंद घेता येईल. (Pune News)

या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना दैनंदिन कामांसाठी चालत जाण्यासाठी जवळच्या मेट्रो स्टेशन किंवा बस स्टॉपवर चालत जाण्यासाठी, किंवा कामावर, शाळा, महाविद्यालयात किंवा दैनंदिन कामांसाठी वैयक्तिक वाहने सोडून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास प्रोत्साहित केले जाते.

पादचारी दिनाचा ‘वॉक वे’ किंवा ‘नो व्हेइकल झोन’ हा गरुड गणपती चौकापासून सुरू होऊन कुंटे चौकात संपेल. या ठिकाणी नागरिकांना ये-जा करण्यासाठी, एक प्रायोगिक सेवा म्हणून पुणे मेट्रोने गरुड गणपती चौक ते विजय टॉकीज चौक या दरम्यान ई-स्कूट सुविधेंच्या माध्यमातून ‘ड्रॉप ऑफ किंवा पिक यू’ सुविधा सुरू केली आहे. यामुळे नागरिकांना मेट्रो फीडर सेवेचा लाभ घेताना शहराच्या दृश्यांचा आनंद घेता येल. हा उपक्रम खाजगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास प्रोत्साहित करतो, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी योगदान देतो.

याशिवाय, विजय टॉकीज चौकाजवळ एक ‘व्हॉट्स-ॲप तिकीट बूथ’ उभारण्यात आले आहे, ज्यामुळे नागरिकांना त्यांच्या प्रवासाचे सोयीस्कर नियोजन करता येईल आणि सार्वजनिक वाहतूक सेवांचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल.

पुणे मेट्रो आणि पुणे महानगरपालिका यांनी घेतलेला त्यांचा पुढाकार आरोग्यदायी, अधिक किफायतशीर जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सार्वजनिक वाहतूक पर्याय निवडून आपण सर्वजण चांगल्या, सक्षम आणि पर्यावरणपूरक पुण्याच्या जडणघडणीत योगदान देणार आहोत.

पुणे मेट्रो शहरातील रहिवाशांना एक कार्यक्षम, पर्यावरणपूरक आणि विश्वासार्ह वाहतूक व्यवस्था प्रदान करण्यासाठी, रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी आणि सक्षमतेला चालना देण्यासाठी वचनबद्ध आहे. पुणे मेट्रो सर्व पुणेकरांना या चळवळीत सहभागी होण्यासाठी आणि शहराच्या पर्यावरणावर आणि जीवनमानावर सकारात्मक प्रभाव टाकण्यासाठी आमंत्रित करते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0